Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedCII पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी ऋषि कुमार बागला, उपाध्यक्षपदी वीर अडवाणी यांची निवड

CII पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी ऋषि कुमार बागला, उपाध्यक्षपदी वीर अडवाणी यांची निवड

 

CII (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) पश्चिम विभागासाठी २०२५-२६ चे नवे नेतृत्व जाहीर करण्यात आले आहे. BG Electricals & Electronics India Ltd. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ऋषि कुमार बागला यांची CII पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे, तर Blue Star Ltd. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीर अडवाणी यांची CII पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

 

ही घोषणा CII (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) पश्चिम विभागीय परिषदच्या पहिल्या बैठकीत करण्यात आली. नव्या नेतृत्वाखाली व्यवसाय वृद्धी, शाश्वत विकास आणि जागतिक विस्तारावर विशेष भर दिला जाणार आहे.CII पश्चिम विभागामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या प्रमुख राज्यांचा समावेश असून, उद्योगसंस्था, सरकार, शिक्षण क्षेत्र आणि समाज यांच्यातील सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी नवीन नेतृत्व कार्यरत राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments