Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedगणेशोत्सव काळात पुणे शहरातील मध्यवर्ती भागात जड-अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी

गणेशोत्सव काळात पुणे शहरातील मध्यवर्ती भागात जड-अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी

पुणे, दि. १० सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सव काळात पुणे शहरातील मध्यवर्ती भागात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने वाहतूक सुरक्षित व सुरळीत ठेवण्यासाठी जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६(१)(ए)(बी), ११६(४) व ११७ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश निर्गमित केला आहे.

दि. १२ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणपती विसर्जनापर्यंत २४ तास खालील रस्त्यांवर जड/अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी राहणार आहे—

शास्त्री रोड – सेनादत्त चौकी चौक ते अलका चौक

टिळक रोड – जेधे चौक ते अलका चौक

कुमठेकर रोड – शनिपार ते अलका चौक

लक्ष्मी रोड – संत कबीर चौक ते अलका चौक

केळकर रोड – फुटका बुरुज ते अलका चौक

बाजीराव रोड – पुरम चौक ते गाडगीळ पुतळा

शिवाजी रोड – गाडगीळ पुतळा ते जेधे चौक

कर्वे रोड – नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक

फर्ग्युसन कॉलेज रोड – खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक

जंगली महाराज रोड – स. गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक

सिंहगड रोड – राजाराम ब्रिज ते सावरकर चौक

गणेश रोड/मुदलियार रोड – पॉवर हाऊस दारुवाला ते जिजामाता चौक ते फुटका बुरुज चौक

अत्यावश्यक सेवेतील वाहने, जसे की अग्निशमन दलाची वाहने, पोलीस वाहने तसेच गणेश देखावे वाहतूक करणारी वाहने यांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments