मुंबई, २७ मार्च २०२५ : सध्याच्या काळात आरोग्य सेवांच्या खर्चामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीत केवळ वैयक्तिक आर्थिक बचतीवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. अनपेक्षित वैद्यकीय आपत्ती आल्यास आपली बचत संपुष्टात येऊ शकते. म्हणूनच वाढत्या खर्चाला तोंड देण्यासाठी आणि दर्जेदार आरोग्यसेवा विनासायास मिळवण्यासाठी आरोग्यविमा हा एक महत्त्वाचा संरक्षक ठरतो. आरोग्यात गुंतवणूक म्हणजे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यात गुंतवणूक! पुढच्या पिढीसाठीही ही गुंतवणूक उपयुक्त ठरते.
आधुनिक आरोग्यविमा पॉलिसी या केवळ रुग्णालयातील खर्चापुरत्या मर्यादित नसतात, तर त्यात ओपीडी सल्लामसलत, टेलिमेडिसिन, प्रतिबंधक तपासण्या आणि आरोग्य व्यवस्थापन कार्यक्रम यांचाही समावेश असतो. यामध्ये मातृत्व काळजी, मानसिक आरोग्य सहाय्य, आणि पुनर्वसन उपचार यांचा समावेश असून संपूर्ण आरोग्याचे संरक्षण दिले जाते. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि कर्करोग यांसारखे जीवनशैलीशी संबंधित आजार वाढत असल्याने आर्थिक सुरक्षेची आवश्यकता अधिक महत्त्वाची ठरते. विशिष्ट आजारांसाठीच्या विमा योजना आणि गंभीर आजारांसाठीचे रायडर्स यांतून दीर्घकालीन सुरक्षितता मिळते, तर प्रतिबंधक आरोग्यसेवा लवकर निदानास मदत करते आणि वैद्यकीय खर्च कमी करण्यास हातभार लावते.
आरोग्यविमा हा केवळ आरोग्याच्या सुरक्षेची हमी देत नाही, तर प्राप्तीकर कायद्याच्या कलम ८०-डी अंतर्गत महत्त्वाचे कर सवलतीचे लाभही प्रदान करतो. आरोग्यविम्याच्या हप्त्यावर करसवलत मिळते, त्यामुळे हा निर्णय आर्थिकदृष्ट्या चांगला ठरतो. ६० वर्षांखालील व्यक्तींना वार्षिक २५,००० रुपयांपर्यंतची करसवलतीची तरतूद आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा ५०,००० रुपये आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीची ही मर्यादा जास्त आहे, कारण त्यांचे आरोग्यविषयक खर्च अधिक असतात.
एसबीआय जनरल इन्शुरन्सचे प्रमुख उत्पादन व विपणन अधिकारी सुब्रमण्यम ब्रह्मजोस्युला म्हणाले, “नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असताना करदाते २०२५ साठी प्राप्तीआर भरण्याची तयारी करत आहेत. यामध्ये नवीन आणि जुन्या करप्रणालीची निवड करताना उत्पन्न, वजावट आणि आर्थिक उद्दिष्टे विचारात घ्यावी लागतात. नवीन करप्रणालीत कराचे दर कमी आहेत, पण वजावटही कमी आहे. जुन्या करप्रणालीत वजावटी आणि सवलती मिळतात. त्यामुळे जास्त खर्च असलेल्या व्यक्तींसाठी ही जुनी करप्रणाली अधिक फायदेशीर ठरते. कलम ८०डी अंतर्गत उपलब्ध असलेल्या प्रमुख वजावटींपैकी एक म्हणजे आरोग्यविमा. करदाता स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आरोग्यविम्याचा हप्ता भरत असल्यास त्याला २५,००० रुपयांपर्यंतची वजावट मिळू शकते, तर ज्येष्ठ पालकांचा विमा घेतल्यास ही रक्कम ५०,००० रुपयांपर्यंत जाते. प्रतिबंधक आरोग्य तपासणीसाठी अतिरिक्त ५,००० रुपयांचा समावेशही या मर्यादेत केला जातो.”
एसबीआय जनरल हेल्थ इन्शुरन्स ही कंपनी विविध आरोग्य गरजांसाठी परवडणाऱ्या आणि लवचिक विमा योजना प्रदान करते. रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च, ओपीडी सल्लामसलत, मातृत्व लाभ आणि गंभीर आजारांसाठीचा विमा अशा विस्तृत कवचामुळे विमाधारकांना मजबूत आर्थिक सुरक्षा मिळते.
नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आरोग्यविमा घेणे म्हणजे आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षिततेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलणे होय. एसबीआय जनरल हेल्थ इन्शुरन्स परवडणाऱ्या, सर्वसमावेशक आणि विश्वासार्ह योजना उपलब्ध करून देते. आरोग्यविमा हा खर्च नसून तुमच्या आर्थिक आणि शारीरिक आरोग्यासाठी एक दूरदृष्टीपूर्ण गुंतवणूक आहे.


