स्टड्स अॅक्सेसरीज लिमिटेड (“द कंपनी”) ही भारतातील आर्थिक वर्ष 2023 मधील महसुलाच्या दृष्टीने सर्वात मोठी दुचाकीसाठी हेल्मेट उत्पादक कंपनी आणि कॅलेंडर वर्ष 2024 मध्ये एकूण प्रमाणाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी दुचाकीसाठीची हेल्मेट उत्पादक कंपनी आहे. (स्त्रोत: CARE अहवाल). कंपनीने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (“सेबी”) कडे आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“डीआरएचपी”) सादर केला आहे.
कंपनी प्राथमिक समभाग विक्रीद्वारे इक्विटी शेअर भांडवलाच्या ऑफरच्या माध्यमातून निधी उभारण्याची योजना आखत आहे. सार्वजनिक ऑफरमध्ये प्रति शेअर 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 7,786,120 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ‘ऑफर फॉर सेल’ चा समावेश आहे.
स्टड्स अॅक्सेसरीज ‘Studds’ आणि ‘SMK’ ब्रँडअंतर्गत दुचाकी चालवताना घालायच्या हेल्मेट्सची डिझाइन, निर्मिती, विपणन आणि विक्री करते. तसेच ‘Studds’ ब्रँडअंतर्गत दोन चाकी सामान, हातमोजे, हेल्मेट लॉकिंग डिव्हाइस, रेनसूट, रायडिंग जॅकेट आणि आयवेअर यासारख्या इतर अॅक्सेसरीजची विक्री करते. कंपनीच्या उत्पादनांची विक्री संपूर्ण भारतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर 70 हून अधिक देशांमध्ये केली जाते. अमेरिका, आशिया (भारत वगळता), युरोप आणि उर्वरित जग या प्रमुख निर्यात बाजारपेठा आहेत. Studds कंपनी Jay Squared LLC साठीही हेल्मेट्सचे उत्पादन करते. ती ‘Daytona’ ब्रँड अंतर्गत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मध्ये विकली जातात तसेच O’Neal साठी त्यांच्या ब्रँडिंग अंतर्गत हेल्मेट्स तयार करून युरोप, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये पुरवठा केला जातो.
आयआयएफएल कॅपिटल सरव्हिसेस लिमिटेड आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड हे या इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) आहेत.


