पुणे, दि. 29 – दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी बेडेकर गणपती मंदिर आणि संगीताचार्य पं. द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानच्या वतीने रामनवमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये गुढीपाडवा (30 मार्च) ते रामनवमी (6 एप्रिल) असे सलग 8 दिवस नामवंत कलाकार शास्त्रीय व सुगम संगीत, गायन आणि किर्तन सादर करणार असल्याची माहिती महोत्सवाचे प्रमुख गोविंद बेडेकर आणि गायिका मंजूषा पाटील यांनी आज येथे दिली. हे सर्व कार्यक्रम पौड रस्त्यावरील बेडेकर गणपती मंदिराच्या सभागृहात दररोज सायं. 5.30 वाजता होणार आहेत. रामनवमी महोत्सवाचे हे 34 वे वर्ष आहे.
गुढीपाडव्याला (30 मार्च) सकाळी 7 वाजता या महोत्सवाचा प्रारंभ अभंगरंगाने होणार असून हे अभंग काणेबुवा प्रतिष्ठानचे विद्यार्थी सादर करणार आहेत तर पद्मश्री पं. व्यंकटेशकुमार यांचे गायन सायं. 5.30 वाजता होणार आहे. सोमवारपासून दररोज सायं. 5.30 वाजता होणार्या कार्यक्रमांमध्ये सोमवार (31 मार्च) रोजी संतूर आणि सरोद जुगलबंदी, तारा कानन, मंगळवार (1 एप्रिल) रोजी षड्ज गोडखिंडी यांची बासरी व धनंजय जोशी यांचे गायन, बुधवार (2 एप्रिल) रोजी विदुषी मंजूषा पाटील यांचे गायन, गुरुवार (3 एप्रिल) रोजी पं. रघुनंदन पणशीकर यांचे गायन, शुक्रवार (4 एप्रिल) रोजी पं. शौनक अभिषेकी यांचे गायन, शनिवार (5 एप्रिल) रोजी पद्मश्री डॉ. अश्विनी भिडे यांचे गायन तर रविवार (6 एप्रिल) रोजी सकाळी 10.30 वाजता श्रीराम नवमीला या महोत्सवाची सांगता ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांच्या किर्तनाने होणार असून दुपारी 12 वाजता रामजन्म सोहळा संपन्न होणार आहे. सदरचा महोत्सव सर्वांसाठी (भारतीय बैठक) खुला असून आरक्षित खुर्चीसाठी मोबाईल क्र.9960295898 वर संपर्क साधावा, असे संयोजकांनी कळवले आहे.
—————————–


