Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedवनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दि.०४ एप्रिल रोजी वाशी येथे जनता दरबाराचे...

वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दि.०४ एप्रिल रोजी वाशी येथे जनता दरबाराचे आयोजन*

 

*ठाणे,दि.03(जिमाका):-* वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उद्या शुक्रवार, दि.०४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

नागरिकांनी आपली निवेदने लेखी स्वरूपात तीन प्रतीत सादर करायची आहेत. नागरिक आपले नाव नोंदणी करून आपल्या समस्या किंवा अडचणीचा निपटारा करू शकणार आहेत.

यापूर्वी झालेल्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला होता. दि.०४ एप्रिल रोजी होणाऱ्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी आपल्या समस्या मांडून त्यांचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments