Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedअकरावी विज्ञान शाखेतील प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांसाठी फर्ग्युसनचा मोफत बेसिक फाउंडेशन कोर्स

अकरावी विज्ञान शाखेतील प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांसाठी फर्ग्युसनचा मोफत बेसिक फाउंडेशन कोर्स

 

 

 

फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 45 दिवसांचा मोफत बेसिक फाउंडेशन कोर्स सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ . डी. डी. कुंभार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

 

प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व जीवशास्त्र या विषयांचे पायाभूत ज्ञान (बेसीक कन्सेप्टस) पक्के करून घेण्यासाठी व स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी विशेषतः जेईई,नीट, एमएचटी – सीईटी यासारख्या परीक्षांच्या माध्यमातून भविष्यात इंजिनियर, डॉक्टर बनण्यासाठी फाउंडेशन कोर्सची अत्यंत आवश्यकता आहे. या कोर्समध्ये १० वी पर्यंतच्या गणित व शास्त्र विषयांची उजळणी होणार आहे. या कोर्समध्ये जेईई,नीट, एमएचटी – सीईटी या परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक असणार्‍या अभ्यासक्रमाचा चांगला अभ्यास व्हावा यासाठी पीसीएम व पीसीबी या ग्रुपचे बेसीक पक्के करून घेण्यासाठी तज्ञ व प्रदीर्घ अनुभव असलेले नामांकित प्राध्यापकवर्ग मार्गदर्शन करणार आहेत. या कोर्सच्या माध्यमातून भविष्यात शास्त्रज्ञ ही होता येईल.

 

गुरुवार दिनांक १० एप्रिल पासून हा फाऊंडेशन कोर्स सुरू होणार आहे. रोज सकाळी 9.00 ते दुपारी 12.00 या वेळेत कोर्स सुरू राहणार आहे. यासाठी १० वी ची परीक्षा दिलेले इच्छूक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यासाठी खालील दिलेली लिंक भरून रजिस्ट्रेशन करावे व मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.

https://registration.deccansociety.org/Registration/Apply/FCJR

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments