Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedरामरक्षा घरोघरी रघुनाथक कृपा करी' या उपक्रमाचे अयोध्येत समर्पण*  *भक्तिसुधा फाऊंडेशन,...

रामरक्षा घरोघरी रघुनाथक कृपा करी’ या उपक्रमाचे अयोध्येत समर्पण*  *भक्तिसुधा फाऊंडेशन, पुणे व समर्थ व्यासपीठ, पुणे यांच्या वतीने आयोजन ; उपक्रमात १ लाख ६७ हजार ५५३ रामभक्तांचा सहभाग* 

 

 

पुणे: अयोध्येतील राम मंदिर निर्मितीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भक्तिसुधा फाऊंडेशन, पुणे व समर्थ व्यासपीठ पुणे यांच्या वतीने आयोजित ‘रामरक्षा घरोघरी रघुनाथ कृपा करी’ या उपक्रमाच्या एकत्रित संख्येचे समर्पण अयोध्येत श्रीराम मंदिरात श्रीराम चरणी करण्यात आले. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांनी भक्तिसुधा फाऊंडेशनचे अध्यक्ष व संगीतकार आशिष केसकर यांच्या हस्ते ही संख्या स्वीकारली.

 

राम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त रामभक्तांनी आपापल्या घरी तीन वेळा सामाजिक संकल्प करून कुटुंबातील सर्वांनी मिळून सामूहिक रामरक्षा पठण करणे, मारुती स्तोत्राचा एक पाठ व एक राम नामजपाची माळ असा हा उपक्रम होता. आपल्या पठणाची व सहभागी लोकांची संख्या भक्तिसुधा फाऊंडेशनच्या संपर्क क्रमांकावर तसेच ईमेलद्वारे कळवावी, अशी विनंती रामभक्तांना करण्यात आली होती. त्या सर्व संख्येचे संकलन करून ही संख्या श्रीराम चरणी अर्पण करण्यात आली.

 

आशिष केसकर म्हणाले, या उपक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारताच्या अनेक प्रांतांमधून लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तसेच जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, जपान अशा अनेक देशांमधून रामभक्तांनी हा संकल्प पूर्ण करून आपली संख्या कळवली. अनेक शाळा कार्यालय तसेच मंदिरांमधून देखील हा उपक्रम अत्यंत उत्साहात पूर्ण केला. या उपक्रमात १ लाख ६७ हजार ५५३ रामभक्तांनी सहभाग घेतला, एकूण रामरक्षा पठण संख्या ५ लाख ०२ हजार ६५९ इतकी झाली, त्याचबरोबर १ लाख ६७ हजार ५५३ मारुती स्तोत्राचे पठण झाले. तर सुमारे १ कोटी ८१ लाख ९५ हजार ७२४ रामनाम जप भाविकांनी केला. दरवर्षी श्री राम मंदिराच्या वर्धापनदिनी हा उपक्रम आयोजित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments