राष्ट्रीय, ४ एप्रिल २०२५: थम्स अप हा कोका-कोला इंडियाचा आयकॉनिक बिलियन-डॉलर ब्रँड आपले नवीन पेय थम्स अप एक्सफोर्ससह नो-शुगर बेव्हरेज स्पेसला नव्या उंचीवर घेऊन जाण्यास सज्ज आहे. पॉवर-पॅक, नो शुगर बेव्हरेजेसच्या विश्वामध्ये साहसी नवीन पेय, जे स्वादिष्ट वच व उच्च फिझसह ‘ऑल थंडर’ अनुभव देते. ब्रँड आपला ५०वा वर्धापन दिन साजरा करण्यास सज्ज असताना हे लाँच महत्त्वपूर्ण टप्पा आहे, जे नो-शुगर ऑफरिंगसह थम्स अपची प्रबळ व साहसी ओळख अधिक दृढ करत आहे, जे त्याच्या आयकॉनिक स्ट्राँग टेस्टबाबत तडजोड करत नाही.
ऑल थंडर, नो शुगर. या टॅगलाइनमधून सर्वकाही व्यक्त होते. थम्स अप एक्सफोर्स स्वत:सोबत स्पर्धा असल्याची भावना असलेल्या, मर्यादित भावना व्यक्त करण्याची इच्छा असलेल्या आणि सतत मर्यादांना दूर करणाऱ्या व्यक्तींसाठी डिझाइन करण्यात आले आहे. आकर्षक, प्रीमियम ब्लॅक डिझाइन सर्वांचे लक्ष वेधून घेते, जेथे ब्रँडचा शीतपेयांचा आस्वाद घेणाऱ्या तरूणांचे लक्ष वेधून घेण्याचा मनसुबा आहे.
थम्स अप एक्सफोर्ससाठी मागणी त्याच्या ऑफिशियल पदार्पणापूर्वी वाढत आहे. थम्स अप व झेप्टोने विशिष्टता सक्षम करण्यासाठी आणि उत्साह निर्माण करण्यासाठी क्यू कॉम इंडस्ट्री फर्स्ट प्री बुक फिचर लाँच करण्याकरिता सहयोग केला. अॅपवरील विनासायास एकीकरण ग्राहकांना देशभरात सादर होण्यापूर्वी थम्स अप एक्सफोर्सच्या पहिल्या सिपचा आस्वाद घेण्यास सक्षम करते, जेथे त्यांना सर्वांच्या अगोदर ब्रँडच्या पुढील उत्क्रांतीचा अनुभव मिळतो. या सहयोगामधून तरूणांशी सुसंगत असण्याप्रती आणि नाविन्यपूर्ण व विनासायास पद्धतीने तंत्रज्ञानाचा फायदा घेत त्यांना प्रीमियम उत्पादनांचा अनुभव देण्याप्रती थम्स अप व झेप्टोची कटिबद्धता दिसून येते.
कोका-कोला इंडिया व साऊथवेस्ट एशियाच्या स्पार्कलिंग फ्लेवर्सच्या कॅटेगरी हेड सुमेली चॅटर्जी म्हणाल्या, ”थम्स अपसह आम्ही नेहमी अग्रस्थानी राहिलो आहोत. थम्स अप एक्सफोर्स त्या दिशेने साहसी पाऊल आहे, हे नो-शुगर ऑफरिंग तीच स्ट्राँग टेस्ट आणि थंडरस किक देते, जे ग्राहकांना आवडते. यामधून नाविन्यतेप्रती, तसेच थम्स अपला आयकॉनिक करणाऱ्या बाबीशी बांधील राहण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. झेप्टोसोबत सहयोगाने आम्ही खात्री घेत आहोत की, ग्राहकांना बाजारपेठेत बहुप्रतिक्षित नवीन बेव्हरेज लवकर उपलब्ध होईल, ब्रँड्स व प्लॅटफॉर्म्स उद्योगामध्ये नवीन मापदंड स्थापित करण्यासाठी एकत्र येण्याच्या पद्धतींना नव्या उंचीवर घेऊन जाईल.”
झेप्टाचे सह-संस्थापक कैवल्य वोहरा म्हणाले, ”ऑफिशियल लाँचपूर्वी थम्स अप एक्सफोर्सला मिळालेल्या उत्स्फूर्त मागणीमुळे आमचे पहिले प्री-बुकिंग फिचर लाँच करण्यासाठी हे परिपूर्ण उत्पादन ठरले आहे, जे सामान्यत: फक्त इलेक्ट्रॉनिक्समध्ये पाहायला मिळते. अगोदर हजारो साइन-अप्स मिळण्यासह हा टप्पा तंत्रज्ञान-नेतृत्वित इनोव्हेटर म्हणून झेप्टोच्या स्थानाला अधिक दृढ करतो, क्विक कॉमर्स अनुभवाला अधिक उत्साहित करतो. आमच्या प्लॅटफॉर्मची गतीशीलता आणि सखोल युजर इनसाइट्सचा फायदा घेत आम्ही सोयीसुविधा देण्यासोबत भारतीयांच्या खरेदी करण्याच्या पद्धतींच्या भविष्याला नवीन आकार देत आहोत.”
थम्स अप एक्सफोर्स देशभरातील शेल्फमध्ये लवकरच दाखल होणार आहे, पण झेप्टो युजर्सना प्रथम थंडरचा अनुभव घ्यायला मिळेल. मर्यादांना दूर करण्यास आणि ऑल थंडर, नो शुगरच्या पहिल्या सिपचा आस्वाद घेण्यास सज्ज राहा
.


