Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedदेवेंद्र भुजबळ यांना रोटरी पुरस्कार जाहीर*

देवेंद्र भुजबळ यांना रोटरी पुरस्कार जाहीर*

 

 

प्रसार माध्यमे आणि समाज माध्यमांद्वारे समाज कल्याणासाठी निवृत्ती पश्चातही सातत्याने योगदान देत असल्याबद्दल रोटरी इंटरनॅशनल या जगातील सर्वात मोठ्या, १२० वर्षे जुन्या स्वयंसेवी संस्थेच्या नवी मुंबई शाखेतर्फे श्री देवेंद्र भुजबळ यांना *व्यावसायिक नैपुण्य पुरस्कार* जाहीर करण्यात आला आहे.

 

नवी मुंबईत येत्या रविवारी होणार असलेल्या एका मोठ्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे रोटरी इंटरनॅशनल संस्थेच्या, नवी मुंबई सिवुड्स शाखेचे अध्यक्ष कपिल अगरवाल यांनी कळविले आहे.

 

श्री भुजबळ हे वृत्त पत्रकारिता, दूरदर्शन, आकाशवाणी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि त्यानंतर व्यक्तिशः प्रसार माध्यमे आणि समाज माध्यमांद्वारे, *प्रेरणादायी पुस्तके लिहून समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करीत आहेत* .

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments