पुणे,4 एप्रिल 2025 : निकॉन इंडिया लि.ने झेड5II कॅमेरा सादर करून इमेजिंग उद्योगात नवीन मानक प्रस्थापित केले आहे. हा एक पूर्ण-फ्रेम मिररलेस कॅमेरा असून विविध परिस्थितीत अतुलनीय कामगिरी देण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. यातील प्रगत इमेजिंग क्षमतेसह झेड5II व्हिडिओग्राफर आणि छायाचित्रकारांना कमी प्रकाशाच्या वातावरणात देखील अचूकतेसह उच्च गुणवत्तेच्या प्रतिमा,व्हिडिओ टिपता येणार आहेत. पॉवरफुल ऑटोफोकस,कटिंग एज इमेज प्रोसेसिंग आणि ॲडव्हान्स्ड स्टॅबिलायझेशन सिस्टिममुळे प्रत्येक फ्रेममध्ये स्पष्ट परिणाम मिळू शकतात. 24.5 मेगापिक्सल झेड5 मध्ये उच्च कार्यक्षमता असलेली वैशिष्टये उपलब्ध करण्यात आली आहेत.


