पुणे,3 एप्रिल 2025 : नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरच्या ईमर्जन्सी विभागाला एनएबीएच प्रमाणपत्र मिळाले आहे. प्रक्रियांचे कठोर मुल्यांकन केल्यानंतर हे गुणवत्ता प्रमाणपत्र सुरक्षित आणि उच्च दर्जाची आपात्कालीन सेवा प्रदान करण्याच्या क्षमतेसाठी दिले गेले आहे. याबरोबरच पुणे आणि भारतातील अशा प्रकारचे प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या निवडक रूग्णालयांच्या यादीत नोबल हॉस्पिटलचा समावेश झाला आहे. नोबल हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने शुभेच्छा देत मिळालेले हे प्रमाणपत्र ईमर्जन्सी विभागाच्या टीमकडे सुपूर्त केले.
नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरमधील ईमर्जन्सी ॲन्ड ट्रॉमा विभागाचे प्रमुख डॉ.प्रथमेश राऊत म्हणाले की, आमच्या विभागातील कामकाजाच्या पध्दती अतिशय संरचित पध्दतीने तयार केल्या जातात.या प्रमाणपत्राअंतर्गत आपात्कालीन किंवा गंभीर स्थितीत असलेल्या रूग्णांच्या निकटवर्तीयांचा फोन आल्याच्या क्षणापासून ते उपचारापर्यंत सर्व प्रक्रियांना आणि कर्मचाऱ्यांसाठी संपूर्ण गुणवत्ता मानके लागू होतात.रूग्णाकडून फोन आल्यापासून ते ॲम्ब्युलन्समध्येच उपचार सुरू केल्यापासून ते रूग्णालयात येईस्तोवर सर्व यंत्रणा सज्ज करण्यापासून प्रत्येक प्रक्रिया ही रचनात्मक पध्दतीने राबविली जाते.याशिवाय ईमर्जन्सी विभागात वेटिंग टाईम कमीत कमी वेळ राहील आणि रूग्णाला लवकरात लवकर योग्य सुविधेमध्ये घेऊन जाण्यात येईल हे सुनिश्चित केले जाते.
ते पुढे म्हणाले की,प्रमाण कामकाज पध्दती (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स) कार्यरत असल्यामुळे कोणतेही पाऊल चुकत नाही आणि प्रत्येक रूग्णाला समान दर्जाचे उपचार मिळतात.गेल्या वर्षी प्राप्त झालेल्या जेसीआय गोल्ड सील मुळे सर्व एसओपी आधीच अस्तित्वात होत्या आणि यामध्ये देखील आम्ही सतत सुधारणा करत राहतो.
ते पुढे म्हणाले की,आमच्याकडे नवीन व सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक इंडक्शन प्रोग्राम राबविला जातो.नवीन सामील झालेल्या कर्मचाऱ्यांना सर्व प्रक्रिया समजण्यासाठी एक आठवड्याचा प्रोबेशन इंडक्शन कालावधी देखील असतो.
एनएबीएच हे भारतातील रूग्णालयांसाठी एक प्रमुख गुणवत्ता मान्यता मंडळ आहे,जे आरोग्य सुविधांसाठी मानके निश्चित करते.ही मानके आंतरराष्ट्रीय पध्दतींवर आधारित असून याचे उद्दिष्ट दर्जेदार उपचार आणि रूग्णसुरक्षेला प्रोत्साहन देणे हे आहे.ईमर्जन्सी विभागासाठी एनएबीएच प्रमाणपत्र दोन वर्षांसाठी दिले जाते.
नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की,हे प्रमाणपत्र ईमर्जन्सी विभागात दाखल झालेल्या रूग्णांसाठी जागतिक गुणवत्तेचे उपचार आणि सुरक्षा दर्शविते.गेल्या वर्षी आम्हाला जेसीआय प्रमाणपत्र मिळाले होते,जे जागतिक स्तरावर सर्वोच्च दर्जाचे प्रमाणपत्र मानले जाते.आता मिळालेल्या एनएबीएच प्रमाणपत्रामुळे रूग्णांच्या फायद्यासाठी गुणवत्ता आणि सुरक्षितेत सतत सुधारणा करण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळकटी मिळाली आहे.
नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप माने यांनी ईमर्जन्सी विभागाच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले.ते म्हणाले की,आमच्या प्रवासात हे प्रमाणपत्र आणखी एक महत्त्वाचा टप्प्ाा असून रूग्णांना जागतिक दर्जाच्या सेवा देण्याच्या आमच्या ध्येयाला आणखी बळक
टी देईल.


