फेब्रुवारी १, २०२४, नवी दिल्ली…
अनेक वर्षांचे प्रखर संशोधन व विकास, परिपूर्ण अचूक रचना आणि आकर्षक डिझाइन कारागिरीसह भारतातील पहिली व एकमेव प्रिमिअम, पण किफायतशीर अलॉई व्हील्स उत्पादक कंपनी अॅडवान्टेक व्हील्स अलॉई व्हील्स आफ्टरमार्केटमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्यास सज्ज आहे. डिझाइनर निवडी आणि एआर-संचालित मोबाइल अॅपचा वापर करत उच्च दर्जाच्या फिटमेंटसह अॅडवान्टेक व्हील्सचे ग्राहक-केंद्रित उत्पादन इनोव्हेशन व विक्री उपक्रम ग्राहकांना आनंदी करण्यामध्ये आणि कार सुरक्षिततेमध्ये नवीन बेंचमार्क्स स्थापित करतील. या मेड इन इंडिया प्रिमिअम उत्पादनांची नवीन श्रेणी जसे कोहिनूर, स्पायडर आणि ब्लॅक विडो १ ते ३ फेब्रुवारी २०२४ पर्यंत प्रगती मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑटोमेकॅनिका २०२४ मध्ये प्रदर्शित करण्यात येतील.
आतापर्यंत ऑटोमोटिव्ह उत्साही कार मालकांच्या मनात आयातित केलेल्या व्हील्सचा दर्जा, मर्यादित पर्याय आणि अनुपयोगी फिटमेंट एडस् यामुळे त्यांच्या व्हील निवडींबाबत शंका होती. तरीदेखील उच्च दर्जात्मक, टिकाऊ, आकर्षक व सुरक्षित असलेल्या डिझाइनर व्हील्ससह कारचे लुक्स अधिक आकर्षक करण्याची पूर्ण झालेली इच्छा प्रवासी वाहनांच्या वाढत्या विक्रीसह वाढत आहे. जाणकार भारतीय कार मालक त्यांच्या प्रिमिअम कार्सना उत्तम आकर्षकता, अद्वितीय क्षमता, उच्च दर्जाचे फिनिश व सुरक्षिततेच्या हमीसह लुक्स व कार्यक्षमतेत वाढ करणाऱ्या कार फॅशन अॅक्सेसरीजच्या माध्यमातून डिझाइनर स्टेटमेंट देण्यास उत्सुक आहेत. हे आव्हान स्वीकारत अॅडवान्टेक व्हील्स आर्थिक वर्ष एप्रिल २०२४ मध्ये बाजारपेठेत त्यांची क्रांतिकारी उत्पादने सादर करत आहेत. कंपनीच्या अत्याधुनिक निर्माण प्लांटमधून आकर्षकरित्या व अचूकरित्या डिझाइन करण्यात आलेली ही ‘मेड-इन-इंडिया’ फ्लो-फोर्ज अलॉई व्हील्स ५ दशकांच्या ऑटोमोटिव्ह उत्पादन सर्वोत्तमतेसह उत्पादन कार्यक्षमता व विपणनामधील नवीन तंत्रज्ञान सुधारणांचा फायदा घेत उत्पादित करण्यात आली आहेत.
अॅडवान्टेक व्हील्सचे अनेक क्रांतिकारी ‘फर्स्टस्’ अलॉई व्हील्स आफ्टरमार्केटमध्ये कायमस्वरूपी परिवर्तन घडवून आणण्यास सज्ज आहेत. कंपनीची युजर-अनुकूल वेबसाइट www.advantecwheels.com ग्राहकांना भारतभरातील प्रबळ वितरक/रिटेल नेटवर्ककडून त्यांच्या पसंतीचे विविध प्रकारचे व्हील्स खरेदी करण्यास सक्षम करते. ही सर्वसमावेशक श्रेणी प्रभावी आहे, जेथे ग्राहक १६ इंच, १७ इंच, १८ इंच, २० इंच व २२ इंच व्हील आकारांमध्ये उपलब्ध असलेल्या ३ विशिष्ट डिझाइन सिरीजमधून निवड करू शकतात.
तसेच, माहितीपूर्ण व्हिडिओंची सिरीज ‘हाय ऑन व्हील्स’ ग्राहकांना स्मार्टर निवड करण्यामध्ये मदत करण्यासह त्यांच्या संबंधित वाहनांनुसार चाकाचा आकार व खरेदी केले जाणारे टायर्स याबाबत परिपूर्ण मार्गदर्शन करते. ही सिरीज लवकरच रीलीज करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, अॅडवान्टेक व्हील्सचा अद्वितीय तंत्रज्ञान इनोव्हेशन ‘फ्लोटिंग व्हील कॅप्स’ भारतीय ऑटोमोबाइल उद्योगामधील पहिला उल्लेखनीय उपक्रम आहे. हा रचनात्मक आविष्कार व्हीलच्या आकर्षकतेला प्रमाणित व्हील्सच्या तुलनेत नव्या उंचीवर घेऊन जातो, जेथे फ्लोटिंग व्हील कॅप्स वाहन व चाक गतीशील असताना अपराइट राहतात.
आणखी एक महत्त्वपूर्ण प्रगती म्हणजे अत्याधुनिक हब-केंद्रित रिंग. या रिंग्ज विशिष्ट वाहनामध्ये एडब्ल्यू व्हील्स परिपूर्णपणे फिट बसण्याची खात्री देतात, ज्यामुळे उच्च गतीमध्ये वेईकल क्रूझ होत असताना व्हील्सचे डिसओरिएण्टेशन किंवा वोबलिंगची शक्यता कमी होते. आजच्या कारमालकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्यासाठी या सर्व सुविधा बारकाईने वितरित करण्यात आल्या आहेत.
या गेम-चेंजिंग विपणन व विक्री धोरणांबाबत सांगताना अॅडवान्टेक व्हील्स प्रा. लि.चे सह-संस्थापक श्री. जसनीत सिंग म्हणाले, ”५० टक्क्यांहून अधिक आफ्टरमार्केट मागण्या मोठ्या प्रमाणात आयातित केलेल्या अविश्वासनीय व्हील्सद्वारे पूर्ण केल्या जातात, ज्यामुळे ग्राहकांना मर्यादित निवडी मिळतात. उद्योगामधील या समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही ग्राहकांना आमच्या वेबसाइटच्या माध्यमातून, तसेच संपूर्ण भारतातील आमच्या बी२बी वितरण नेटवर्कच्या माध्यमातून ऑनलाइन प्रिमिअम फ्लो-फोर्ज अलॉई व्हील्सची श्रेणी प्रदान करणार आहोत. यासंदर्भात आमचे अत्याधुनिक व युजर-अनुकूल मोबाइल अॅप ग्राहकांच्या अंदाजाचे निराकरण करण्यासाठी ऑगमेण्टेड रिअॅलिटीचा वापर करते. यामुळे ते वास्तविक विश्वात त्यांच्या वाहनांवर व्हील्स कसे दिसतील हे पाहू शकतील. म्हणून ग्राहक त्यांच्या संबंधित वाहनांच्या टायर्सच्या बाजूला त्यांच्या स्मार्टफोनचा कॅमेरा ठेवत आमच्या अलॉई व्हील डिझाइन्स व फिनिशेसच्या व्यापक श्रेणीमधून सर्वोत्तम निवड करू शकतात.”
व्यापक उत्पादनांबाबत सांगताना श्री. सिंग म्हणाले, ”जम्मू येथील आमच्या हाय-टेक, पूर्णत: ऑटोमेटेड उत्पादन प्लाण्टने अभियांत्रिकी सर्वोत्तमतेचा स्तर उंचावला आहे. कॅलेंडर वर्ष २०२४ मधील पहिल्या व दुसऱ्या तिमाहीच्या सुरूवातीला बाजारपेठेत उपलब्ध असणारे आमचे अलॉई व्हील्स जागतिक मानकांशी संलग्न अत्याधुनिक उत्पादन प्रकिया, दर्जा व कार्यक्षमतेचा वापर करत इन-हाऊस निर्माण, डिझाइन व सत्यापित करण्यात येतील. ५० वर्षांहून अधिक काळाच्या सर्वोत्तम ऑटोमोटिव्ह व्हील उत्पादन अनुभवासह आम्ही तंत्रज्ञान क्षमता, उत्पादन सर्वोत्तमता आणि ग्राहक-केंद्रित विपणन व विक्री इनोव्हेशन्ससंदर्भात आमच्या प्रतिस्पर्धींपेक्षा अग्रस्थानी आहोत. आम्ही आमच्या आयकॉनिक व्हील डिझाइन्सच्या माध्यमातून ग्राहकांना आनंद देण्यामध्ये नवीन बेंचमार्क्स स्थापित करण्याप्रती कटिबद्ध आहोत, तसेच आमच्या विशिष्ट डिझाइन फिलोसॉफीचा अवलंब करत आहोत. बाजारपेठेत सादर करण्यात आलेले आणखी एक वैशिष्टय म्हणजे आमचे जागतिक दर्जाचे एलीमेण्ट पेन्टिंग, जे ग्राहकांना त्यांच्या कारच्या आकर्षकतेला जुळणाऱ्या डिझाइननुसार जवळपास २५ अद्वितीय पेंट फिनिशेससह एडब्ल्यू व्हील्स सानुकूल करण्याची सुविधा देते.


