Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedकृषी विभागाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे येत्या बुधवारी आयोजन

कृषी विभागाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे येत्या बुधवारी आयोजन

 

 

पुणे, दि. ७: राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी तसेच कृषी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्याच्या दृष्टीने राज्यातील कृषी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या एक दिवसीय कार्यशाळेचे बुधवारी (९ एप्रिल) रोजी बॅडमिंटन हॉल शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, म्हाळुंगे येथे करण्यात आले आहे.

 

 

 

९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी राज्याचे कृषीमंत्री, कृषी राज्यमंत्री, कृषी विभागाचे प्रधान सचिव, कृषी आयुक्त, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे (पोकरा) प्रकल्प संचालक, स्मार्ट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक, महाबीज, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, राष्ट्रीय फलोद्यान अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक आदींसह अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

 

 

 

या कार्यशाळेत राज्यातील कृषी विभागाचे सर्व कृषी संचालक, विभागीय कृषी सहसंचालक, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक, मंडळ कृषी अधिकारी तसेच प्रत्येक तालुक्यातून प्रातिनिधिक स्वरूपात एक कृषी पर्यवेक्षक व एक कृषी सहायक असे सुमारे २ हजार २०० अधिकारी- कर्मचारी सहभागी होणार आहेत. तसेच अन्य कर्मचारी कृषी विभागाच्या https://www.youtube.com/@AgricultureDepartmentGoM या यूट्युब चॅनेलच्या माध्यमातून सहभागी होऊ शकणार आहेत.

 

 

 

मानवाने केलेल्या तांत्रिक प्रगतीमुळे शेतीचा प्रवास पारंपरिक शेतीपासून ते कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत झाला आहे. या प्रवासात कृषी विभाग आणि शेतकरी सक्षम राहिला पाहिजे या दृष्टीकोनातून कार्यशाळेचे आयोजन केले आहे. राज्यात अशा प्रकारे राज्यस्तर ते गावस्तर एकाच पातळीवर येण्याची ही किंबहुना पहिलीच वेळ आहे.

 

 

 

या कार्यशाळेत कृषी विभाग व शेतकऱ्यांच्या समोरील वातावरण बदलाचे परिणाम, भविष्यातील संधी व आव्हानांना सामोरे जाणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना सक्षम करण्यावर भर राहणार आहे. त्यादृष्टीने विविध सत्रांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. त्यामध्ये डिजिटल मार्केटिंगचा कृषी क्षेत्रातील सहभाग, कृषी उत्पादन प्रक्रियेतील संधी व आव्हाने, कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, शेतकऱ्याचे उत्पन्न वाढीसाठी घ्यावयाचे विविध उपक्रम आदींसारखे महत्त्वाचे विषय समाविष्ट असतील. याशिवाय, राज्यभरात उल्लेखनीय कार्य करणारे कृषी अधिकारी-कर्मचारी हे त्यांचे अनुभवाबाबत मनोगत व चर्चासत्रात भाग घेणार आहेत, अशी माहिती कृषी संचालक (प्रक्रिया व नियोजन) विनयकुमार आवटे यांनी

दिली आहे.

 

0000

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments