काही दिवसांपूर्वी मला जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सर्वेसर्वा आपल्या सर्वांचे स्नेही डॉक्टर कैलाश पवार आणि शासकीय रक्तपेढीचे जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी श्री.गिरीश चौधरी यांचा फोन आला होता. त्यांनी तेव्हा एक काळजी व्यक्त केली की, जिल्हा रुग्णालयातील रक्त साठा अत्यंत कमी झाला आहे. त्यामुळे रक्तदान शिबिर घेणे अत्यावश्यक झाले आहे.
त्यानुसार जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत उद्योग सहसंचालक विजू शिरसाट व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आख्यातारीत असलेल्या सर्व औद्योगिक आस्थापनांना रक्तदान शिबिर आयोजित करण्याबाबत प्रोत्साहनात्मक आवाहन केले.
या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत वासिंद येथील जे. एस. डब्ल्यू कंपनीने आज त्यांच्या कंपनीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यासाठी तेथील जनसंपर्क अधिकारी श्री.अमेय यांनी मोलाची मदत केली.
*या सामाजिक कार्यात सहभागी सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदनही…!*
सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना, प्रसारमाध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या सहकाऱ्यांनाही नम्र आवाहन आहे की, आपणही आपणास शक्य असल्यास रक्तदान जरूर करावे किंवा आपणास शक्य नसल्यास किमान इतरांना रक्तदानाविषयी प्रोत्साहन द्यावे.


