पुणे,15 एप्रिल २०२५ : केईएम हॉस्पिटल पुणे येथे १७,१८ आणि १९ एप्रिल २०२५ दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत सांधेरोपण (जॉईंट रिप्लेसमेंट) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सांधेदुखीचा त्रास,पायऱ्या चढताना होणारा त्रास,बसताना होणारा त्रास अशी लक्षणे आढळत असल्यास शिबिरास जरूर भेट द्या. गरज असल्यास शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात केली जाईल. या शिबिरामध्ये एक्स-रे व लॅब तपासणीवर 20 टक्के सवलत मिळणार आहे. शिबिरासाठी प्रवेश मोफत असून नोंदणी अनिवार्य आहे. नोंदणीसाठी ०२० ६६०३७४६०/८३७८९८००२१ या क्रमांकावर संपर्क साधावा.


