नवीन एकमत पेपरमधून सिद्ध झाले आहे की, दररोज बदाम खाल्ल्याने हृदय व आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि दररोज किमान ५० ग्रॅम बदाम खाल्ल्याने काही लोकांमध्ये थोडे वजन कमी होते
भारत, एप्रिल २०२५ – नवीन पीअर-रिव्ह्यू केलेल्या प्रकाशनात, जगातील आघाडीच्या आरोग्य व पोषण तज्ञांनी निष्कर्ष काढला आहे की, दररोज बदाम खाल्ल्याने कार्डिओमेटाबॉलिक आरोग्यासाठी अर्थपूर्ण फायदे होतात. अकरा शास्त्रज्ञ व डॉक्टरांनी बदाम आणि कार्डिओमेटाबॉलिक आरोग्यावरील संशोधनाचे विश्लेषण केले आणि प्रमुख आरोग्य क्षेत्रांमध्ये बदामाच्या फायद्यांबाबत एकमत सादर केले. तज्ञांना आढळून आले की दररोज बदाम खाणे हे हृदयाचे आरोग्य, वजन व्यवस्थापन आणि आतड्यांतील सूक्ष्मजीवांसाठी अनुकूल आहार धोरण आहे. या पेपरमध्ये निष्कर्ष काढण्यात आला आहे की, बदामाचे जास्त सेवन (दररोज किमान ५० ग्रॅम/१.८ औंस किंवा जवळपास दोन सर्व्हिंग) काही लोकांमध्ये वजन कमी करण्यास मदत करू शकते.
आल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्नियाने निधीसाह्य केलेल्या वैज्ञानिक गोलमेज परिषदेनंतर करंट डेव्हलपमेंट्स इन न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एकमत पेपरमध्ये (consensus paper) निष्कर्ष काढण्यात आला आहे की, दररोज बदाम सेवन केल्याने पुढील फायदे होऊ शकतात:
खालील बाबींद्वारे हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करू शकतात:
एलडीएल-कोलेस्ट्रॉल कमी करत (५.१ मिलीग्रॅम किंवा एकत्रित परिणामांमध्ये सरासरी ५ टक्के घट).
लहान, पण लक्षणीय प्रमाणात डायस्टोलिक रक्तदाब कमी करत (एकत्रित परिणामांमध्ये ०.१७-१.२ mmHg घट), या दोन्ही बाबींसह हृदयास आरोग्यदायी आहाराचे सेवन केल्यास अधिक फायदे मिळू शकतात.
वजन वाढत नाही; बदामाचे जास्त सेवन (दररोज किमान ५० ग्रॅम किंवा १.८ औंस) काही संशोधनामधील सहभागींमध्ये वजन कमी करण्यास मदत करू शकते.
लाभदायी आतड्यांच्या जीवाणूंमध्ये वाढ करू शकते, शक्यतो चयापचय आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करते. मर्यादित संशोधनामुळे या क्षेत्रात अधिक संशोधनांची गरज आहे.
विशेषत: प्री-डायबिटीज असलेल्या आशियाई भारतीयांमधील फास्टिंग ब्लड ग्लुकोज आणि एचबीए१सी मध्ये घट करू शकते.
जगभरात कार्डिओमेटाबॉलिक आजार वाढत आहेत आणि मानवी आरोग्याचे संरक्षण करण्यात बदामांची भूमिका शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. “बदामांमध्ये पौष्टिक घटक संपन्न प्रमाणात असतात, तसेच बदाम जगभरात सर्वाधिक संशोधन करण्यात आलेले फूड देखील आहे,” असे या पेपरचे सह-लेखक, युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमधील महामारीविज्ञानाचे प्राध्यापक आणि जगातील आघाडीचे पोषण तज्ञ डॉ. अॅडम ड्रेवोव्स्की म्हणाले. “जगभरातील संशोधक बदाम कार्डिओमेटाबॉलिक गोलमेज परिषदेमध्ये आले होते. विविध दृष्टिकोन आणि सखोल तज्ञता एकत्रित करत समूहाने एकमताने निष्कर्ष काढला की, बदाम कार्डिओमेटाबॉलिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतात. संभाव्य यंत्रणांमध्ये एलडीएल-कोलेस्टेरॉल कमी करणे आणि डायस्टोलिक रक्तदाब कमी करणे, आरोग्यदायी वजन व्यवस्थापनात मदत करणे आणि आतड्यांचे आरोग्य उत्तम राखणे याचा समावेश आहे.”
आशियाई भारतीयांसंदर्भात या संशोधनातून निदर्शनास आले आहे की, दररोज बदाम सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य, चयापचय आणि वजन व्यवस्थापनात मदत होते. “आशियाई भारतीयांमध्ये कार्डिओमेटाबॉलिक आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता बदामासारखे पोषक घटकांनी संपन्न, कमी ग्लायसेमिक फूड्स एलडीएल कोलेस्ट्रॉल, डायस्टोलिक रक्तदाब आणि फास्टिंग ब्लड ग्लुकोज कमी करण्यास मदत करू शकतात,” असे फोर्टिस सेंटर फॉर डायबिटीज, ओबेसिटी अँड कोलेस्ट्रॉल (सी-डीओसी)चे अध्यक्ष आणि नॅशनल डायबिटीज ओबेसिटी अँड कोलेस्ट्रॉल फाउंडेशन (एनडीओसी), इंडियाचे प्रमुख डॉ. अनुप मिश्रा म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “या सल्ल्यासह संतुलित आहाराचे सेवन बैठेकाम करण्याची जीवनशैली असलेल्या तरुण भारतीयांसाठी विशेषतः उपयुक्त आहे. खरेतर, नुकतेच दोन संशोधनांमधून प्रीडायबिटीज आणि जास्त वजन/लठ्ठपणा असलेल्या आशियाई भारतीयांसाठी रक्तातील साखर नियंत्रणात बदामाचे फायदे निदर्शनास आले आहेत. संशोधन करण्यात आलेल्या जवळपास एक चतुर्थांश (२३.३ टक्के) व्यक्तींमध्ये बदामांच्या नियमित सेवनाने प्रीडायबिटीज किंवा ग्लुकोज असहिष्णुता सामान्य रक्तातील साखरेच्या पातळीपर्यंत परतल्याचे दिसून आले.”
नॅशनल डायबिटीज, ओबेसिटी अँड कोलेस्ट्रॉल फाउंडेशनच्या न्यूट्रिशन रिसर्च ग्रुपच्या प्रमुख डॉ. सीमा गुलाटी म्हणाल्या, “भारतातील वाढती कार्डिओमेटाबॉलिक आरोग्यासंदर्भात समस्या पाहता अगदी योग्य वेळी हे पीअर-रिव्ह्यू केलेले प्रकाशन करण्यात आले आहे. यामधून निदर्शनास आले की, बदामाचे सेवन आशियाई भारतीयांमध्ये एलडीएल कोलेस्ट्रॉल, फास्टिंग ब्लड ग्लुकोज आणि एचबीए१सी कमी करण्यास मदत करू शकते. हे संशोधन बदाम वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात या गैरसमजाला दूर करते आणि त्याऐवजी निदर्शनास आणते की, दररोज ५० ग्रॅम (१.८ औंस) बदाम सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.”
या एकमत पेपरचे निष्कर्ष बदामाच्या कार्डिओमेटाबॉलिक फायद्यांसाठी विशिष्ट आहेत आणि सर्व नट्ससाठी ते सामान्यीकृत केले जाऊ शकत नाहीत. एक औंस (२८ ग्रॅम) बदाम ६ ग्रॅम प्रथिने, ४ ग्रॅम फायबर, १३ ग्रॅम अनसॅच्युरेटेड फॅट, फक्त १ ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट आणि १५ आवश्यक पौष्टिक घटक प्रदान करतात, ज्यात ७७ मिलीग्रॅम मॅग्नेशियम (१८.३ टक्के डीव्ही), २०८ मिलीग्रॅम पोटॅशियम (४ टक्के डीव्ही) आणि ७.२७ मिलीग्रॅमम व्हिटॅमिन ई (५० टक्के डीव्ही) यांचा समावेश आहे.
कार्डिओमेटाबॉलिक आरोग्यामध्ये हृदय, रक्तवाहिन्या आणि चयापचय प्रणालीचे आरोग्य किंवा शरीराची अन्न पचन करण्याची प्रक्रिया यांचा समावेश असतो. हृदयरोग, लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारखे कार्डिओमेटाबॉलिक आजार जगभरात साथीच्या आजाराप्रमाणे पसरत आहेत, ज्याला अनारोग्यकारक आहार आणि अयोग्य जीवनशैली कारणीभूत आहे.
“दशकांच्या वैज्ञानिक पुराव्यांची काळजीपूर्वक तपासणी केल्यानंतर आम्ही निष्कर्ष काढला की, बदाम हृदय आणि चयापचय आरोग्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहेत. दररोज स्नॅक्स म्हणून बदामांचे सेवन केल्याने, तसेच सलाड्स व इतर पाककलांमध्ये बदामांचा समावेश केल्याने प्लाझ्मा लिपिड प्रोफाइल आणि आहाराचा दर्जा सुधारतो, यासोबत जीवनाचा दर्जा देखील उत्तम राहतो,” ड्रेवोव्स्की म्हणाले.
कार्डिओमेटाबॉलिक आरोग्यासाठी बदामाच्या फायद्यांवरील तज्ञांच्या एकमताबद्दल अधिक माहिती:
२०० हून अधिक पीअर-रिव्ह्यू केलेल्या प्रकाशनांनी बदामाच्या आरोग्यदायी फायद्यांचा (health benefits) शोध घेतला आहे. वैज्ञानिक तज्ञांनी त्यांच्या पुनरावलोकनात खालील प्रमुख निष्कर्षांवर एकमत दिले:
वजन व्यवस्थापन आणि गट मायक्रोबायोम (चयापचय आरोग्य)
बदामाच्या सेवनाने वजन वाढत नाही. दररोज ५० ग्रॅम (१.८ औंस) किंवा त्यापेक्षा जास्त बदाम सेवन केल्याने वजन कमी होऊ शकते. बदामांमध्ये प्रथिने, फायबर आणि फॅटसारखे पोषक घटक असतात, ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक लागत नाही, तसेच व्यक्तींमधील कॅलरीचे प्रमाण कमी करू शकते.
नियमितपणे बदाम सेवन केल्याने आतड्यातील सूक्ष्मजीवांमध्ये सकारात्मक बदल होतात, आतड्यामध्ये आरोग्यदायी बॅक्टेरियाची वाढ होते आणि ब्युटायरेट सारख्या शॉर्ट-चेन फॅटी अॅसिडचे उत्पादन वाढते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी आणि चयापचय आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
प्रीडायबिटीज असलेल्या आशियाई भारतीयांना देखील बदामांच्या सेवनाचा फायदा होऊ शकतो, कारण दररोज बदाम सेवन केल्याने फास्टिंग ब्लड ग्लुकोज आणि एचबीए१सी मध्ये मोठ्या प्रमाणात घट होते असे संशोधनातून दिसून आले आहे.
हृदयाचे आरोग्य
दररोज बदाम सेवन केल्याने एलडीएल-कोलेस्ट्रॉल आणि डायस्टोलिक रक्तदाबामध्ये काही प्रमाणात लक्षणीय घट होऊ शकते.
ही घट वैद्यकीयदृष्ट्या कमी असली तरी इतर हृदयासाठी आरोग्यदायी फूड्स किंवा डॅश (DASH) किंवा पोर्टफोलिओ डाएट्स सारख्या आहार पद्धतींसह बदाम सेवन केल्याने व्यक्तींच्या आरोग्यासाठी संभाव्य महत्त्वपूर्ण फायदे होऊ शकतात. हे दृष्टिकोन कार्डिओमेटाबॉलिक आरोग्यास मदत करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
बदामांमध्ये प्रति सर्व्हिंग १३ ग्रॅम अनसॅच्युरेटेड फॅट असते. ठोस पुरावा आहे की, अनसॅच्युरेटेड फॅटऐवजी नसॅच्युरेटेड फॅटचे सेवन केल्याने हृदयसंबंधित आजाराचा धोका कमी होऊ शकतो.
संशोधन एकमत: जगप्रसिद्ध तज्ञ शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांच्या समूहाच्या निष्कर्षांनुसार, सध्याच्या पुराव्यामधून निदर्शनास येते की दररोज बदाम सेवन केल्याने कार्डिओमेटाबॉलिक आरोग्य जोखीम घटकांना फायदा होऊ शकतो. या संशोधनामधून निदर्शनास येते की, बदाम एलडीएल-कोलेस्ट्रॉल आणि डायस्टोलिक रक्तदाबावर सकारात्मक परिणाम करतात, आतड्यांमध्ये गुणकारी बॅक्टेरियांची निर्मिती करतात, वजन व्यवस्थापनास साह्य करतात आणि प्रीडायबिटीज असलेल्या आशियाई भारतीयांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण आरोग्यदायी राहण्यास मदत करू शकतात.
###
गोलमेज परिषदेबाबत
गोलमेज परिषदेत अॅडम ड्रेवोव्स्की, पीएच.डी.; अनूप मिश्रा, एम.डी.; फ्रान्स बेलिसल, पीएच.डी.; जॅक गिल्बर्ट, पीएच.डी.; जेम्स ओ. हिल, पीएच.डी.; जेमी डी. आर्ड, एम.डी.; जॉन एल. सिव्हनपायपर, एम.डी., पीएच.डी.; कॅरोल ई. वॉटसन, एम.डी., पीएच.डी.; महा ताहिरी, पीएच.डी.; पॉला ट्रम्बो, पीएच.डी. आणि रोनाल्ड क्लेनमन, एम.डी. यांचा समावेश होता.
आल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्निया बाबत
कॅलिफोर्निया बदाम आपण कशाप्रकारे वाढतो आणि कशाप्रकारे संगोपन करतो यानुसार जीवन उत्तम करतात. कॅलिफोर्नियाचे बदाम हे नैसर्गिक, आरोग्यदायी व दर्जेदार खाद्यपदार्थ आहे. कॅलिफोर्नियातील ७,६०० बदाम उत्पादक शेतकरी आणि प्रक्रियाकर्ते उद्योग यांच्या वतीने आल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्निया विपणन, कृषी व उत्पादनाच्या सर्व पैलूंसाठी त्यांच्या संशोधन-आधारित दृष्टिकोनाच्या माध्यमातून बदामांना प्रोत्साहन देण्याचे काम करते. याच्याशी संबंधीत उद्योगांतील अनेक कुटुंबांचा हा परंपरागत व्यवसाय आहे. कॅलिफोर्नियातील मॉडेस्टोमध्ये असलेल्या आणि १९५० मध्ये स्थापन झालेली आल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्नियाही ना-नफा तत्त्वावर असलेली संघटना आहे. ही संस्था युनायटेड स्टेट्सच्या कृषी विभागांतर्गत बदाम उत्पादकांच्या कृतिशील सहभागातून फेडरल मार्केटिंग ऑर्डरचे व्यवस्थापन करण्याचे काम करते. आल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्निया किंवा बदामांविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी Almonds.com येथे भेट द्या किंवा कॅलिफोर्निया आल्मंड्सना Facebook, Twitter, Pinterest, Instagram आणि the Californi
a Almonds blog येथे भेट द्या.


