Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे जिल्हा ॲथलेटिक्समध्ये ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंचे वर्चस्व रूशील कौल ला सुवर्ण...

पुणे जिल्हा ॲथलेटिक्समध्ये ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंचे वर्चस्व रूशील कौल ला सुवर्ण पदक व पार्थ लांडे ला कांस्य पदक 

 

 

पुणे १७ एप्रिल : बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या पीडीए स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या धावपटूंनी आपल्या प्रतिभेची चमक दाखविली आहे. धावपटू रूशील कौल याने ४०० मीटर झोनल स्पर्धेत सुवर्ण पदक आणि ६०० मीटर झोनल स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले आहे. तसेच धावपटू पार्थ लांडे हा ६०० मीटर मध्ये कांस्यपदकाचा मानकरी ठरला आहे.

रुशील कौल ने ४०० मीटर शर्यत पूर्ण केली.रुशील याची  वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने स्पर्धेत २ पदक पटकावले आहे.

खेळाडूंच्या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी म्हणाले,  जिल्हा ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणे हे एका खेळाडूसाठी खूप मोठे यश आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू अनेक खूप कठोर मेहनत करतात. त्यांच्या प्रयत्नांना योग्य यश मिळवणे हे त्यांचे लक्ष्य असते. या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणे म्हणजे त्या व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांची परीक्षा आहे.

तसेच प्रिन्सिपल संगीता राउतजी म्हणाल्या, या स्पर्धेत खेळाडूंना विविध प्रकारच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये चांगले प्रदर्शन करावे लागते. खेळाडूंच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे हे प्रतीक आहे. या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणे हे केवळ एक खेळाडूचे यश नाही तर ते त्यांच्या कुटुंबाचे आणि त्याच्या समुदायाचे यश आहे. खेळाडू हा आपल्या समाजासाठी एक प्रेरणा बनतात.

या खेळाडूंना प्रशिक्षक धीरज घाडगे आणि ऋषिकेश पवार यांचे यशस्वी मार्गदर्शन मिळाले.

 

ध्रुव ग्लोबल स्कूल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments