Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedदैनंदिन जीवनात थोडेसे बदल करून आपण यकृताचे आरोग्य जपू शकतो : तज्ञ

दैनंदिन जीवनात थोडेसे बदल करून आपण यकृताचे आरोग्य जपू शकतो : तज्ञ

पुणे,18 एप्रिल 2025 : यकृत हे सर्वांत महत्त्वाच्या अवयवांपैकी एक असून चयापचय,पचन,रोगप्रतिकारक शक्ती,शरीरात नको असलेले घटक बाहेर काढणे असे बहुविविध कार्य पार पाडते.परंतु चुकीच्या जीवनशैलीमुळे यकृताच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम झाला आहे.आपल्या जीवनशैलीमध्ये,दैनंदिन गोष्टींमध्ये काही साधे बदल करून आपण यकृताचे आरोग्य जपू शकतो,असे मत तज्ञांनी व्यक्त केले.

 

दरवर्षी 19 एप्रिल रोजी जागतिक यकृत दिन या महत्त्वाच्या अवयवाच्या कार्यावर आणि त्याच्या आरोग्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकतो.यावर्षीची संकल्पना फूड इज मेडिसीन असून यकृताचे आजार रोखण्यासाठी समतोल आहाराचे महत्त्व अधोरेखित करते.

 

नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर येथील हेपॅटोलॉजिस्ट व गॅस्ट्रोइंटेरोलॉजिस्ट डॉ.प्रमोद कटारे म्हणाले की,चुकीची जीवनशैली आणि भरपूर साखर,चरबीयुक्त आहार,मैदा समाविष्ट असलेल्या पदार्थांचे नियमित सेवन या सर्व गोष्टींमुळे फॅटी लिव्हरची जोखीम वाढत आहे.याकडे दुर्लक्ष केल्यास यकृताचे नुकसान होऊ शकते.चिंतेची बाब ही आहे की,बरेच रूग्ण हे 20 किंवा 30 वयोगटातील असतात.आपल्या यकृताचे सुमारे 80 टक्के नुकसान झाल्याशिवाय लक्षणे दिसून येत नाहीत.त्यामुळे हे नुकसान सुरू राहते आणि कालांतराने अशा टप्प्यापर्यंत पोहचते की जिथून परत मागे येणे अवघड जाते.फॅटी लिव्हरच्या बाबतीत सहसा कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत.सामान्यपणे थकवा जाणवू शकतो.याचे निदान आरोग्य शिबिरांमध्ये तपासणी दरम्यान सहसा होते.काही वेळा निदान ॲसिडीटीसारख्या इतर कारणांमुळे उपचारासाठी येणाऱ्या लोकांमध्ये तपासण्यांद्वारे होते.

 

ते पुढे म्हणाले की, फॅटी लिव्हर ही स्थिती स्थुलता किंवा रक्तदाबासारखीच झपाट्याने वाढत चालली आहे.म्हणूनच याबाबत जागरूकता गरजेची आहे.आजची जीवनशैली लक्षात घेता लिव्हर फंक्शन टेस्ट (एलएफटी) सारखी सोपी रक्ताची चाचणी आणि गरज भासल्यास सोनोग्राफीच्या माध्यमातून फॅटी लिव्हरचे निदान लवकरच्या टप्प्यात होऊ शकते.ज्यांची जीवनशैली ही चुकीची आहे,त्यांनी वयाच्या 25 नंतर एलएफटीची चाचणी करणे फायद्याचे ठरेल.जेव्हा फॅटी लिव्हरचे निदान प्राथमिक टप्प्यात होते,तेव्हा जीवनशैली आणि दिनचर्येत बदल सुचविले जातात.याचा फायदा झाला नाही तर औषधे दिली जातात. सध्या इंटरमिटंट फास्टींग हे तरूणांमध्ये लोकप्रिय झाले आहे.मात्र हे करत असताना आपल्या मर्यादा ओळखून वजन कमी करण्यासाठी टोकाचे पाऊल उचलू नका. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्याला झेपेल तेवढ्या काळासाठी उपवास केल्यास फायदा होऊ शकतो.पण फॅटी लिव्हर दूर करण्यासाठी आहाराबरोबर व्यायामाचे देखील तेवढेच महत्त्व

आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments