Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedआयडेमित्‍सू होंडा रेसिंग इंडिया राइडर्स २०२५ एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपसाठी थायलंडमध्‍ये...

आयडेमित्‍सू होंडा रेसिंग इंडिया राइडर्स २०२५ एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपसाठी थायलंडमध्‍ये दाखल

गुरूग्राम, २४ एप्रिल २०२५: देशातील टॅलेंटना निपुण करण्‍यासोबत भारतीय राइडर्सना जागतिक मोटरस्‍पोर्ट मॅपवर घेऊन जाण्‍याच्‍या दिशेने प्रबळ पाऊल उचलत आयडेमित्‍सू (IDEMITSU) होंडा रेसिंग इंडियाने एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप (एआरआरसी)च्‍या २०२५ सीझनसाठी आपल्‍या आंतरराष्‍ट्रीय रेसिंग टीमची घोषणा केली आहे. या वीकेण्‍डला २५ ते २७ एप्रिल २०२५ पर्यंत आयोजित करण्‍यात आलेल्‍या सीझनच्‍या पहिल्‍या राऊंडसाठी राइडर्सचे थायलंडमध्‍ये आगमन झाले आहे.

या उपक्रमामधून भारतातील तरूण राइडर्सना जागतिक दर्जाचे अॅथलीट्स बनवण्‍याप्रती होंडाची कटिबद्धता दिसून येते, तसेच आशियामधील सर्वात स्‍पर्धात्‍मक सर्किट्समध्‍ये ब्रँडची अभियांत्रिकी व रेसिंग क्षमता निदर्शनास येते. भारतातील राइडर्सना आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर प्रगती करण्‍यास मदत करण्‍याकरिता पाइनलाइन तयार करण्‍यासाठी होंडाच्‍या व्‍यापक दृष्टिकोनाचा भाग म्‍हणून हा उपक्रम तरूण टॅलेंटना आशियामधील सर्वोत्तम राइडर्ससोबत रेस करण्‍याची आणि देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी करण्‍याची संधी देतो. तसेच या उपक्रमामधून भारतातील मोटरस्‍पोर्ट्ससाठी प्रबळ पाया घडवण्‍याप्रती होंडाची समर्पितता देखील दिसून येते.

२०२५ एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपमध्‍ये सहा राऊंड्स असतील, ज्‍याची सुरूवात थायलंडमधील चँग इंटरनॅशनल सर्किट येथे २५ ते २७ एप्रिल २०२५ पर्यंत आयोजित करण्‍यात आलेले ऑफिशियल टेस्‍ट आणि सीझन ओपनरसह होईल. दुसरा राऊंड मलेशिया येथे ३० मे ते १ जून २०२५ पर्यंत होईल, ज्‍यानंतर जुलैमध्‍ये जपान (तिसरा राऊंड) आणि ऑगस्‍टमध्‍ये इंडोनेशिया (चौथा राऊंड) येथे या चॅम्पियनशीपचे आयोजन करण्‍यात येईल. पाचव्‍या राऊंडसाठी स्‍थळ आणि टाइमलाइनची घोषणा अद्याप झालेली नसली तरी सीझन फिनाले डिसेंबरमध्‍ये थायलंड येथे आयोजित करण्‍यात येईल.

२०२५ सीझनसाठी एशिया प्रॉडक्‍शन २५० सीसी (एपी२५०) क्‍लासमधील दोन उदयोन्‍मुख भारतीय राइडर्स: १९ वर्षीय केविन क्विंटल आणि १८ वर्षीय जोहान रीव्‍हज आयडेमित्‍सू होंडा रेसिंग इंडियाचे प्रतिनिधीत्‍व करतील. केविनने एआरआरसीच्‍या गेल्‍या सीझनमध्‍ये सहभाग घेतला आहे, तर चॅम्पियनशीपमधील या सीझनसाठी नवीन राइडर महणून जोहानची घोषणा करण्‍यात आली आहे.

केविन समार क्विंटलच्या २०२४ एआरआरसी सीझनमधील कामगिरीमधून त्‍याचे कौशल्‍य व निर्धार दिसून येतो. होंडा इंडिया टॅलेंट कप २०२३ चा विद्यमान विजेता असलेला तो २०१९ मध्ये होंडा रेसिंग इंडियामध्ये सामील झाला आणि एशिया टॅलेंट कप २०२२ मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व देखील केले. आशिया रोड रेसिंग चॅम्पियनशिप (एआरआरसी)च्या २०२५ सीझनची तयारी सुरू असताना होंडा रेसिंग इंडिया २०१९ मध्ये आयडेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप (एचआयटीसी)मध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या जोहान रीव्हज इमॅन्युएलला प्रकाशझोतात आणण्यास उत्सुक आहे. गेल्या काही वर्षांत त्याच्या देशांतर्गत रेसिंगमधील कामगिरीमध्‍ये लक्षणीय सुधारणा झाली, ज्‍यामधून त्‍याची क्षमता दिसून आली आणि त्याला थायलंड टॅलेंट कप २०२४ मध्ये प्रतिष्ठित स्थान मिळाले.

आपले विचार व्‍यक्‍त करत केविन समर क्विंटल म्‍हणाला, “एआरआरसीच्‍या गेल्‍या सीझनमध्‍ये रेसिंग केली असल्‍यामुळे मला या स्‍तरावर कराव्‍या लागणाऱ्या स्‍पर्धेबाबत बहुमूल्‍य अनुभव आणि माहिती मिळाली आहे. २०२५ मध्‍ये मी सर्व मिळवलेल्‍या माहितीचा उपयोग करण्‍याचा, माझी कौशल्‍ये अधिक निपुण करण्‍याचा निश्‍चय केला आहे, तसेच टॉप १० रँकिंग्‍जमध्‍ये प्रबळ फिनिशिंग करण्‍याचा माझा मनसुबा आहे. मी सतत संधी देण्‍यासोबत रेसर म्‍हणून मला विकास करण्‍यामध्‍ये मदत करण्‍याकरिता अविरत पाठिंबा देण्‍यासाठी होंडा रेसिंग इंडियाचे मन:पूर्वक आभार व्‍यक्‍त करतो.”

जोहान रीव्हज इमॅन्युएल म्‍हणाला, “२०२५ एआरआरसीचा भाग असणे माझ्यासाठी मोठी संधी आहे. ही फक्‍त रेसिंग नाही तर त्‍यामधून शिकण्‍याची, प्रगती करण्‍याची आणि मी आशियामधील सर्वोत्तम रेसर्ससोबत स्‍पर्धा करू शकतो हे दाखवून देण्‍याची संधी मिळाली आहे. हा माझा पहिलाच एआरआरसी सीझन असणार आहे आणि मी या प्रवासाचा भाग होण्‍यास उत्‍सुक आहे. मी टॉप १० रँकिंग्‍जमध्‍ये स्‍थान मिळवण्‍यासाठी माझा सर्वत्तोपरी प्रयत्‍न करेन. मी माझ्यावर विश्‍वास दाखवण्‍यासाठी आणि हा प्‍लॅटफॉर्म देण्‍यासाठी होंडा रेसिंग इंडियाचे आभार मानतो.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments