Saturday, October 24, 2026
Google search engine
HomeUncategorized*पिंपरी येथे अयोध्येच्या श्रीराम मंदिराची अनुभूती मिळणार टायटॅनिक आणि नायगरा धबधब्याचे ही...

*पिंपरी येथे अयोध्येच्या श्रीराम मंदिराची अनुभूती मिळणार टायटॅनिक आणि नायगरा धबधब्याचे ही विशेष आकर्षण*

 

 

श्रद्धा, इतिहास आणि मनोरंजनाचा अनोखा अनुभूती साठी; प्रदर्शन ४५ दिवस सुरू राहणार… पिंपरी येथील भव्य दिव्य समारोह

 

पुणे : भारतातील हिंदूंच्या श्रद्धेचे अधिष्ठान असलेलं अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर तसेच जगप्रसिद्ध ऐतिहासिक टायटॅनिक जहाज व नायगरा धबधब्याची अद्भुत दृश्याची प्रतिकृती पाहण्याची संधी पिंपरी येथील हिंदुस्तान अँटिबायोटिक मैदानावरती आयोजित पीसीएमसी कार्निव्हल मध्ये मिळणार आहे.

श्रीनिवास राव यांच्यावतीने या प्रदर्शनाचे २६ ऑक्टोबर पासून आयोजन करण्यात आलं आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण आहे. त्यासोबत टायटॅनिक जहाज व नायगरा धबधब्याची प्रतिकृतीही नागरिकांना पाहता येणार आहे.

अनेकांचे श्रद्धास्थान असलेलं अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर

हे भारतीय धार्मिक परंपरेतील महत्त्वाची वास्तू आहे.

अनेकांना आयोध्यामध्ये जाण शक्य नसल्याने त्याची अनुभूती नागरिकांना येथे मिळावी या उद्देशाने अयोध्येचा राम मंदिर हे केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.

हे मंदिर जवळून पाहता यावं नागरिकांना छायाचित्रे घेता यावीत आणि मंदिराच्या भव्यतेचा अनुभव अविस्मरणीय असणार आहे.

तसेच या प्रदर्शनात जगप्रसिद्ध असलेल टायटॅनिक जहाज व उत्तर अमेरिकेतील प्रसिद्ध आकर्षक नायगरा धबधब्याची प्रतिकृती आहे.

जागतिक स्तरावरील पर्यटन स्थळाची झलक या प्रदर्शनाच्या माध्यमातून पिंपरी मध्ये अनुभवता येणार आहे

२६ ऑक्टोबर पासून हे प्रदर्शन ४५ दिवस सुरू असणार आहे.

दुपारी १२ ते राञी ११ वाजेपर्यंत प्रदर्शन सुरू असणार या प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावं असं आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments