Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोदरेजतर्फे कॉम्पॅक्ट पर्सनल रूम कूलर ‘एज मिनीकूल’ सादर ~ पुढील...

गोदरेजतर्फे कॉम्पॅक्ट पर्सनल रूम कूलर ‘एज मिनीकूल’ सादर ~ पुढील वर्षी एअर कूलर श्रेणीतून 50% वाढीचे उद्दिष्ट

भारत, 28 एप्रिल 2025: कडक उन्हाळ्यातील तापमान लक्षात घेऊन आणि घर गार ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या ग्राहकांच्या तातडीच्या गरजेला प्राधान्य देत गोदरेज एन्टरप्राइजेस ग्रुपचा भाग असलेल्या गोदरेज अँड बॉयसच्या अॅप्लायन्सेस बिझनेसने एअर कूलर विभागात आपले नवीनतम सादरीकरण अर्थात एज मिनीकूल हा एक कॉम्पॅक्ट पर्सनल कूलर सादर केला आहे. हे उत्पादन सहज हलवता येणारे, दिसायला छान आणि प्रभावीपणे हवा गार करण्याच्या वाढत्या मागणीच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आले आहे.

 

 

 

गोदरेजचा एज मिनीकूल हा एक छोटासा, आटोपशीर आणि सोयीस्कर पर्सनल एअर-कूलर असून गारवा वाढविण्यासाठी तो तुमच्या घरात कुठेही सहज हलवता येतो. यामध्ये 37-लिटर पाण्याची टाकी असून वॉटर लेव्हल इंडिकेटर आहे. तसेच अधिक उष्णतेच्या दिवशी अतिरिक्त थंडावा मिळावा यासाठी अंगभूत (इनबिल्ट) आईस चेंबर आहे. यामध्ये 5 ब्लेड असलेला एअरोडायनामिक 12 इंच फॅन असून तो जोरदार एअर थ्रो देतो आणि 3-साइड एअर सक्षनच्या मदतीने उत्कृष्ट कूलिंग करतो. अतिरिक्त सोयी आणि स्वच्छतेसाठी, यात फुली कोलॅप्सिबल लुव्हर्स आणि अँटी-बॅक्टेरियल, वासरहित हनीकॉम्ब कूलिंग पॅड्स आहेत. त्यामुळे अधिक स्वच्छ, आरोग्यदायी आणि ताजी हवा मिळते. टिकाऊपणासाठी डिझाइन केलेले हे कूलर पंप व फॅन मोटर ओव्हरहिटिंगपासून सुरक्षित असून त्यास ब्रेकसह मजबूत कॅस्टर व्हील्स दिले आहेत. त्यामुळे हालचाल सहज सोपी होते.

 

 

 

नवीन सादरीकरणाबद्दल बोलताना गोदरेज एन्टरप्राइजेस ग्रुपच्या अॅप्लायन्सेस बिझनेसचे बिझनेस हेड आणि ईव्हीपी श्री. कमल नंदी म्हणाले, “उन्हाळ्यातील दिवसेंदिवस भीषण वाढते तापमान पाहता ग्राहकांच्या घरात बहुविध, कार्यक्षम आणि परवडणाऱ्या किफायतशीर किंमतीत कूलिंग सोल्यूशन्सची तातडीने गरज निर्माण झाली आहे. एज मिनीकूलच्या सादरीकरणासह आम्ही आमचा कूलिंग पोर्टफोलिओ विस्तृत करत असून आजच्या जागा व्यापणाऱ्या वस्तूंबाबत चोखंदळ ग्राहकांसाठी आटोपशीर, सहज हलवता येणारे आणि बहुपयोगी कूलिंग सोल्यूशन्स सादर करत आहोत. 100 लीटर पर्यंत विस्तृत एअर कूलर पोर्टफोलिओसह आम्ही आर्थिक वर्ष 24-25 मध्ये आधीच दुप्पट वाढ नोंदवली असून पुढील वर्षात एअर कूलर श्रेणीत 50% वाढीचे लक्ष्य ठेवले आहे.”

 

 

 

मेड इन इंडिया असलेली ही गोदरेज एज मिनीकूल श्रेणी आकर्षक वाइन रेड आणि डार्क ग्रे रंगांमध्ये उपलब्ध असून, भारतभरातील स्टोअर्समध्ये ती 10,490 रु. पासून सुरू होणाऱ्या किंमती मध्ये उपलब्ध आहे. या उत्पादनाला 1 वर्षाची सर्वसमावेशक वॉरंटी असून झिरो डाऊन पेमेंटसोबत सोप्या ईएमआय ऑफर्सद्वारेही खरेदी करता येऊ शकेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments