Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोका-कोलाकडून २०२५ च्‍या पहिल्‍या तिमाहीमधील निकाल सादर

कोका-कोलाकडून २०२५ च्‍या पहिल्‍या तिमाहीमधील निकाल सादर

नवी दिल्‍ली, एप्रिल ३०, २०२५ – कोका-कोला कंपनीने आपल्‍या पहिली तिमाही २०२५ निकालांमध्‍ये विकास संधींसह उद्योगामधील वाढ कायम असल्‍याची नोंद केली. ”या तिमाहीमधील आमच्‍या कामगिरीमधून पुन्‍हा एकदा आमच्‍या ऑल-वेदर धोरणाची परिणामकारकता दिसून येते,” असे कोका-कोला कंपनीचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी जेम्‍स क्विन्‍सी म्‍हणाले. ”प्रमुख विकसित बाजारपेठांमध्‍ये काही दबाव असताना देखील आमच्‍या जागतिक फूटप्रिंटच्‍या क्षमतेने आम्‍हाला गुंतागूंतीच्‍या बाह्य वातावरणामधून यशस्‍वीपणे नेव्हिगेट करण्‍यास मदत केली. आमच्‍या उद्देशाशी बांधील राहण्‍यासोबत ग्राहकांशी संलग्‍न राहत आम्‍हाला दीर्घकालीन मूल्‍य निर्माण करण्‍याच्‍या आमच्‍या क्षमतेमध्‍ये विश्‍वास आहे.”

भारतातील कामगिरीची वैशिष्‍ट्ये:

l ट्रेडमार्क कोका-कोला आणि लोकप्रिय प्रादेशिक ब्रँड थम्‍स अप ग्राहक संबंधाला गती देत आहेत आणि पहिल्‍या तिमाहीमध्‍ये बाजारपेठेसाठी दोन-अंकी आकारमान वाढीसाठी योगदान दिले.

l महाकुंभ मेळा फेस्टिवल: कंपनीच्‍या इतिहासामध्‍ये पहिल्‍यांदाच सिस्‍टमने क्रियाकलापांमध्‍ये वाढ केली, ज्‍यामध्‍ये शेकडो रिफ्रेशमेंट झोन्‍स, जवळपास १,४०० मोबाइल स्‍टेशन्‍स आणि जागति‍क विक्रमी १०० कूलर-डोअर वॉलचा समावेश होता, ज्‍यामुळे मेळाव्‍यादरम्‍यान १८० दशलक्षहून अधिक सर्व्हिंग्‍ज करण्‍यात आल्‍या.

l या तिमाहीसाठी युनिट केसमध्‍ये २ टक्‍क्‍यांची वाढ झाली, जेथे भारत, चीन व ब्राझील अग्रस्‍थानी होते.

l जानेवारी, फेब्रुवारी आणि डिसेंबर २०२४ मध्‍ये कंपनीने भारतातील विशिष्‍ट प्रदेशंमध्‍ये आपल्‍या बॉटलिंग ऑपरेशन्‍सची रिफ्रँचायझी केली.

l २९ मार्च २०२४ रोजी समाप्‍त झालेल्‍या तीन महिन्‍यांदरम्‍यान कंपनीने फिलिपाइन्‍समधील आणि भारतातील विशिष्‍ट प्रदेशांमधील बॉटलिंग ऑपरेशन्‍सच्‍या रिफ्रँचायझींगशी संबंधित अनुक्रमे ५९९ दशलक्ष डॉलर्स व २९३ दशलक्ष डॉलर्स निव्‍वळ नफ्याची नोंद केली.

l कंपनीने भारतातील विशिष्‍ट प्रदेशांमधील बॉटलिंग ऑपरेशन्‍सच्‍या रिफ्रँचायझींगशी संबंधित व्‍यवहार खर्चासाठी ७ दशलक्ष डॉलर्स खर्च देखील केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments