Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedटर्टल वॅक्सने महाराष्ट्रातील पुणे येथे चौथ्या कार केअर स्टुडिओचे केले उद्घाटन ...

टर्टल वॅक्सने महाराष्ट्रातील पुणे येथे चौथ्या कार केअर स्टुडिओचे केले उद्घाटन ● अत्याधुनिक, वापरण्यास सोपी असलेली टर्टल वॅक्स® उत्पादनांसह मिळणार विशेष डिटेलिंग सेवा

पुणे, २ मे २०२५:शिकागोस्थित, अवॉर्ड विनिंग कार केअर कंपनी असलेल्या टर्टल वॅक्स इनकॉर्पोरेशनने आज महाराष्ट्रातील पुणे येथे त्यांच्या चौथ्या को-ब्रँडेड कार केअर स्टुडिओचे उद्घाटन केले आहे. हा स्टुडिओ जांभुळकर अव्हेन्यू, हिंजेवाड़ी येथील कार आर्टसोबत भागीदारी करत सुरु करण्यात आला आहे. अत्याधुनिक टर्टल वॅक्स® डिटेलिंग टेक्नॉलॉजी व उच्च प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या टीमसह सुसज्ज असलेला हा स्टुडिओ कारप्रेमींच्या वैयक्तिक आवडीनुसार डिझाइन केलेल्या कार डिटेलिंग सेवा आणि उत्पादनांची विस्तृत श्रेणी प्रदान करतो.
या स्टुडिओचे उद्घाटन पिंपरी चिंचवड शहराचे भाजपा उपाध्यक्ष श्री. राम वाकडकर यांच्या हस्ते व इतर अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
कार आर्ट अनेक वर्षांचा कार केअर व डिटेलिंगचा अनुभव पुण्यात घेऊन आले आहे. टर्टल वॅक्सच्या डिटेलिंग इनोव्हेशन आणि एक्सपर्टरीजसह सर्वोत्तम दर्जाची गुणवत्ता व ग्राहक सेवेद्वारे उत्कृष्ट मूल्य प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेला हा स्टुडिओ प्रोफेशनल वेहिकल मेंटेनन्स व वेहिकल हायजिनसंबधी ग्राहकांच्या गरजा पूर्ण करतो. टर्टल वॅक्सच्या सिरॅमिक व ग्राफीन श्रेणीतील उत्पादनांसह लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरून हा स्टुडिओ कार केअरचे विविध पॅकेजेस सादर करतो, ज्यातून ग्राहकांना उत्कृष्टतेचा सर्वोच्च अनुभव मिळतो.
या कार केअर स्टुडिओमध्ये ग्राहकांना टर्टल वॅक्स® च्या जगप्रसिद्ध डिटेलिंग उत्पादनांचा अनुभव मिळेल, ज्यामध्ये कंपनीकडे पेटंट असलेली ग्राफीन टेक्नॉलॉजी वापरून बनविण्यात आलेले हायब्रीड सोल्युशन्स आणि हायब्रीड सोल्युशन्स प्रो यांचा समावेश आहे.
टर्टल वॅक्स कार केअर इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक श्री. साजन मुरली पुरवंगारा यांनी सांगितले, “महाराष्ट्रातून कार केअरविषयी वाढती आवड आम्ही अनुभवली आहे आणि म्हणूनच पुण्यात आणखी एक स्टुडिओ सुरु करण्याचा निर्णय घेतला. या नव्या स्टुडिओद्वारे आम्ही संपूर्ण राज्यात सर्वोत्तम दर्जाची कार डिटेलिंग सेवा पुरविण्याचा उद्देश ठेवतो. ब्रँडकडे उत्पादनांच्या सर्वात मोठ्या श्रेणीसह अद्वितीय डीआयएफएम सेवा आहेत. आम्हाला विश्वास आहे की कार आर्टसोबतची ही भागीदारी या भागातील ग्राहकांना उत्कृष्ट सेवा आणि फायदे देण्यासाठी मदत करेल. आमच्या डीलर नेटवर्कचा आम्हाला अभिमान आहे आणि आगामी काळात आम्ही ते आणखी मजबूत करून भारतातील टियर 2 व टियर 3 श्रेणीतील शहरांमध्येही पोहोचू.”
ग्राहक आता आपली कार रस्त्यावर काढण्यापूर्वी टर्टल वॅक्स कार केअर स्टुडिओमध्ये येऊन त्यांच्या कारला फ्रेश अँड क्लीन बनवू शकतात. टर्टल वॅक्स® उत्पादने गाडीच्या मूळ रंगाला कोणतीही हानी न पोहचवता तापमानातील मोठे बदल, कारच्या एक्सटेरियरवरील स्क्रॅचेस, डलनेस आणि हवामानाच्या परिणामांपासून सुरक्षित ठेवतात. इंटेरियर क्लीनिंग देखील गाडी चालवताना आनंददायी अनुभव देण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि टर्टल वॅक्स इंटेरियर डिटेलिंग कार केयर प्रॉडक्ट्सची विस्तृत श्रेणी प्रदान करतो.
या नवीन भागीदारीबद्दल बोलताना कार आर्टचे मालक श्री. विशाल अविनाश सूद म्हणाले, “कार आर्टमध्ये आम्ही इनोव्हेशनमधील उत्कृष्टता पुरविण्यासाठी काम करतो आणि ग्राहकांना आनंद देणे हे आमचे ध्येय आहे. कार केअरमधील ग्लोबल लीडर कंपनीसोबत भागीदारी करण्यास आणि त्यांचे प्रतिनिधित्व करण्यास आम्ही उत्सुक आहोत. आम्हाला विश्वास आहे की टर्टल वॅक्ससोबतची ही भागीदारी आमच्यासाठी नव्या उंची गाठणारी ठरेल आणि पुण्यातील कारप्रेमींना नक्कीच आवडेल.”
टर्टल वॅक्स कार केअर स्टुडिओ®मध्ये खालील सेवा उपलब्ध आहेत:
● स्मार्ट शिल्ड® पेंट प्रोटेक्शन फिल्म – ट्रान्सपरंट प्रोटेक्शन फिल्म जी गाडीच्या मूळ रंगाच्या संरक्षणासाठी खास तयार केली आहे.
● ग्रॅफिन कोटिंग – कारच्या रंगाला लॉन्ग लास्टिंग प्रोटेक्शन आणि हाय ग्लॉस शाईनसह टिकाऊ संरक्षण देणारी ग्राफीन कोटिंग
● सिरॅमिक कोट प्रोटेक्शन –स्टॅंडर्ड डिटेलिंग प्रोसेससह पेंट करेक्शन,प्री-क्लीन आणि सिरॅमिक कोट प्रोटेक्शन
● हायब्रीड सिरॅमिक कोटिंग – बेसिक एक्सटीरियर वॉश, रिन्स अँड ड्राय, पेंट करेक्शन, हायब्रिड सोल्युशन्स वॉश अँड वेट वॅक्स आणि हायब्रिड सोल्युशन्स सिरेमिक स्प्रे कोटिंग
● एक्सटीरियर रिस्टोरेशन ट्रीटमेंट – तीन प्रकार: स्मार्ट शिल्ड टेक्नोलॉजीसह पेंट करेक्शन, सुपर हार्ड-शेल शाइन, क्लीन अँड शाइन
● इंटिरियर डिटेलिंग ट्रीटमेंट – बेसिक इंटिरियर क्लीनिंग व कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिरियर क्लीनिंग: कार्पेट्स अँड अपहोल्स्ट्री, रूफ क्लीनिंग, प्लास्टिक्स अँड विनील, लेदर, एसी व्हेंट्स, एयर फ्रेशनर, ड्रेसिंग, रबर बीडिंग, डोर जाम्स, सीट बेल्ट्स, ग्लास
● स्पेशालिटी ट्रीटमेंट – कॉम्प्रिसिंग ऑडर ट्रीटमेंट, हेडलाइट रिस्टोरेशन, रेन-रेपलेंट कोटिंग, ट्रिम्स अँड क्रोम रिस्टोरेशन
● वॉश (45 मिनिटांत) – क्लिनिंग, व्हॅक्युम, कॉकपिट क्लिनिंग, प्री-वॉश, रिन्स,अलॉय व्हील्स अँड टायर्स क्लिनिंग, फोम वॉश, स्प्रेड, रिन्स, ड्राय, ग्लास क्लीनिंग, टायर ड्रेसिंग
टर्टल वॅक्स® उत्पादने आमच्या टोल-फ्री नंबर – 1800 102 6155 आणि आमच्या ग्राहक सेवा टीमद्वारे customercareindia@turtlewax.com वर देखील खरेदी करता येतील.
रिटेलर/डिस्ट्रीब्यूटर होण्यासाठी किंवा ओईएम टाय-अपसाठी आमच्या टर्टल वॅक्स कॉर्पोरेट टीमशी संपर्क करा: indiatradeenquiry@turtlewax.com
भारतात लाँच होणाऱ्या टर्टल वॅक्स® उत्पादनांच्या संपूर्ण यादीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, www.turtlewax.in ला भेट द्या आणि फेसबुकवर @TurtleWax आणि इंस्टाग्रामवर @TurtleWaxIndia या सोशल मीडियावर टर्टल वॅक्सला फॉलो करा.
टर्टल वॅक्सबद्दल थोडक्यात:
टर्टल वॅक्सची सुरुवात 1944 साली पहिल्यांदाच बाटलीबंद कार वॅक्स बाजारात आणल्याने झाली. 75 वर्षांहून अधिक काळानंतरही, ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड इन कार केअर’ म्हणून ओळख असलेला हा ब्रँड सर्व प्रकारच्या कारच्या सरफेससाठी वापरल्या जाणाऱ्या त्यांचे नंबर 1 सेलिंग प्रोडक्ट असलेल्या पेंटवर्क, व्हील्स, टायर्स, अपहोल्स्ट्री, प्लास्टिक आणि इतर उत्पादनांसह आजही ऑटो अपियरन्स इंडस्ट्रीचे लक्ष वेधून घेत आहे. हा ब्रँड ड्रायव्हिंगसाठी असलेल्या प्रेमावर आधारित आहे आणि जगभरातील कारप्रेमींना एकमेकांशी जोडतो आहे.
एक कौटुंबिक व्यवसाय म्हणून टर्टल वॅक्सची खरी ताकद त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि त्यांच्या या क्षेत्राबद्दलच्या उत्कटतेत आहे, जिथे ग्राहक-प्रथम दृष्टिकोन ठेवला जातो. टर्टल वॅक्स® चं वितरण 120 हून अधिक देशांमध्ये होत असून हा ब्रँड जागतिक स्तरावर ओळखला जातो. शिकागो येथील मुख्यालयात आजही अवॉर्ड विनिंग इनोव्हेशन आणि उत्पादने विकसित केली जातात. भारतातही टर्टल वॅक्स अधिकृत विक्रेते आणि वितरण भागीदारांमार्फत आता 35 शहरांमध्ये कार्यरत असून, संपूर्ण देशभरात त्याचे वितरण सशक्तपणे सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments