मुंबई, पुणे – मे 09, २०२५ – एमक्युअर फार्माक्युटिकल्स ही भारतातील फार्मा क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. महिलांच्या आरोग्यासाठी विविध उत्पादनांवर भर देणा-या एमक्युअर फार्माक्युटिकल्स कंपनीने वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातूनही महिलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. ९ मे रोजी जागतिक मातृदिन साजरा केला जात आहे. यंदाचा मातृदिन एमक्युअर फार्माक्युटिकल्स आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याच्या तयारीत आहे. एमक्युअरची निर्मिती असलेल्या अर्थ या ब्रँण्डच्या माध्यमातून कंपनीने आइस बकेट चॅलेंजमध्ये सहभाग घेतला आहे. या चॅलेंजच्या माध्यमातून कंपनी रजोनिवृत्ती या महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित दुर्लक्षित विषयावर जनजागृती करण्यावर भर देणार आहे.
तब्बल अकरा वर्षांपूर्वी आईस बकेट चॅलेंजची संपूर्ण जगाला भुरळ पडली होती. त्यावेळी अमोट्रोफिक लॅटरल स्कलेरोसिस या मेंदूशी संबंधित आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. आता पुन्हा या चॅलेंजने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. आईस बकेट चॅलेंजची वाढती क्रेझ लक्षात घेता अर्थ या ब्रँण्डने महिलांच्या आरोग्याच्या विषयावर जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. समाजात आजही महिलांच्या मासिक पाळीविषयी उघडपणे चर्चा करण्यास मज्जाव केला जातो. रजोनिवृत्ती काळाबद्दल बोलणे तर दूरापास्त ठरते. रजोनिवृती या संकल्पनेबद्दल ब-याचजणांना पुरेशी माहिती नाही. त्यामुळे रजोनिवृत्ती काळात महिलांमध्ये होणा-या बदलांबाबत समाजात जनजागृती करण्याचा धाडसी अर्थ ब्रॅँण्डने निर्णय घेतला.
महिलांच्या रजोनिवृत्तीविषयी जनजागृती करण्यासाठी समाजमाध्यमांवर व्हिडिओ अपलोड करुन अर्थ ब्रँण्डने याविषयीची माहिती दिली आहे. व्हिडिओत तरुण-तरूणी आईट बकेट चॅलेंज पूर्ण करताना दिसतात. प्रत्येकजण खोल श्वास घेतो आणि हातात असलेल्या बादलीतील बर्फाचे पाणी डोक्यावर ओतून घेतो. थंड पाण्यासह बर्फ अंगावर पडताना प्रत्येकाची होणारी धडपड, थंड पाण्यामुळे शरीराला येणारी हुडहुडी आणि या वातावरणातून होणारी विनोदनिर्मिती सुरु असतानाच स्क्रीनवर एक प्रभावी संदेश दिला जाईल. तुमचे आइस बकेट चॅलेंज संपले असले तर आपल्या मातांसाठी उष्णता थांबली नाही, या आशयाचा संदेश व्हिडिओवर दिला जाईल. हा विचारप्रवर्तक संदेश महिलांच्या रजोनिवृत्तीच्या लक्षणांकडे लक्ष वेधतो. रजोनिवृत्ती काळात महिलांमध्ये आढळून येणा-या लक्षणांबद्दल समाजात अद्यापही मोठ्या प्रमाणात अज्ञान पसरलेले आहे.
महिलांमध्ये रजोनिवृत्तीचा काळ सुरु होण्यापूर्वी अनेक बदल घडतात. या दिवसांत महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल घडतात. रजोनिवृत्तीच्या काही वर्षेअगोदर हे बदल घडायला सुरुवात होते. महिलांचे शरीर रजोनिवृत्तीसाठी शरीराची पूर्वतयारी करतात. हा काळ प्रत्येक महिलेसाठी आव्हानात्मक असतो. बरेचदा हे शारिरीक, मानसिक आणि भावनिक बदल असह्य होतात. मध्यान्ह वयोगटात घर-संसाराचा डौलारा सांभाळण्याच्या कसरतीत महिलांचा बांध फुटतो. तुमच्या आईची भावनिक घालमेल वेळीच लक्षात घ्या, या काळात त्यांच्या शरीरात अचानक उष्णता निर्माण होत राहते, रात्रीअपरात्री घाम फुटतो अशा अनेक बदलांचा सामना करताना त्यांची साथ सोडू नका, असे एमक्युअरने आवाहन केले आहे. मातांचा हा भावनिक संघर्ष समजून घ्या, महिलांच्या रजोनिवृत्ती काळातील बदलांबद्दल सार्वजनिक पातळीवर चर्चा होणे गरजेचे आहे, असे आवाहन एमक्युअरने केले आहे.
महिलांची रजोनिवृत्ती हा विषय खुलेपणाने बोलायला हवा, हा मुद्दा मांडताना एमक्युअरच्या पूर्णवेळ संचालिका नमिता थापर यांनी आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, रजोनिवृत्तीत घडणा-या बदलांचा मी स्वतः सामना केला आहे. महिला आणि आई या दुहेरी भूमिका सांभाळताना असंख्य आव्हानांना सामोरे जावे लागते. जागतिक मातृत्व दिनानिमित्ताने रजोनिवृत्तीबद्दल बोलणे अत्यंत आवश्यक ठरते. महिलांच्या आरोग्याची निगा राखणे हे एमक्युअरचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी अर्थ ब्रॅँण्ड सदैव प्रयत्नशील राहील. रजोनिवृत्तीबदद्दलची जनजागृती मोहिम समाजात आमूलाग्र बदल घडवेल, असा विश्वास नमिता थापर यांनी व्यक्त केला.
महिलांच्या रजोनिवृत्तीबद्दल कुटुंबीयांना सजग करणे हा धाडसी दृष्टीकोन अंमलात आणण्यासाठी एमक्युअर प्रयत्नशील आहे. महिलांच्या रजोनिवृत्तीबद्दल सहजतेने चर्चा घडायला हवी. या चर्चेतून महिलांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल घडल्यास ख-या अर्थाने महिलांचे सशक्तीकरण होईल, असा विश्वास एमक्युअरने व्यक्त केला. मातृत्वदिनाचे निमित्त साधून त्यांच्या समस्या जाणून घ्या, संवादावर भर द्या, महिलांना भेटवस्तू, शुभेच्छांचा मोह नसतो. कठीण काळात मुलांची भक्कम साथ, अर्थपूर्ण संवाद हा प्रत्येक महिलेचा जगण्याची नवी भरारी देतो, असा महत्त्वपूर्ण संदेश एमक्युअरने दिला आहे.
महिलांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी अर्थ ब्रँण्डकडून विविध उत्पादनांची निर्मिती केली जाते. रजोनिवृत्ती सुरु होण्याच्या काळापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत महिलांच्या तक्रारींवर उपाय म्हणून अर्थने वेगवेगळी उत्पादने बाजारात उपलब्ध केली आहेत. रजोनिवृत्तीच्या वेगवेगळ्या लक्षणांची सुरुवात झाल्यास अर्थ पेरिमेनोपॉज मल्टी-सिम्पटम सपोर्ट ही गोळी पूरक आहार म्हणून घेता येईल. या काळात महिलांची एकाग्रता कमी होते म्हणून अर्थ ब्रेन फॉग एडही गोळी घेता येईल. या दिवसांत अर्थ इंटिमेट क्रीमही फायदेशीर ठरेल. हाडांमधील ठिसूळपणा कमी करण्यासाठी पूरक आहार म्हणून अर्थ बोन हेल्थ सपोर्टचा समावेश करावा. पुरेशी झोप मिळावी म्हणून अर्थ स्लीप सपोर्ट गमीज, शारिरीक थकवा कमी करण्यासाठी अर्थ फॅटिग सपोर्टचीही मदत घेता येईल. महिलांची रजोनिवृत्ती सुरु होण्यापूर्वी तसेच रजोनिवृत्तीच्या आव्हानात्मक दिवसांत आराम मिळणे महत्त्वाचे असते. त्यांचे आरोग्य जपण्यासाठी आणि शरीराला पुरेसा आराम मिळण्यासाठी ही उत्पादने प्रभावी ठरतात.
यंदाच्या जागतिक मातृत्वदिनाच्यानिमित्ताने आइस बकेट चॅलेंज स्विकारणे हे ख-या अर्थाने पारंपरिक रुढी-परंपरामध्ये गुरफटलेल्या समाजाला संकुचित मनोवृत्तीतून बाहेर काढण्याचे आव्हान आहे. सार्वजनिक पातळीवर रजोनिवृत्तीवर उघडपणे चर्चा व्हायला हवी, असा महत्त्वपूर्ण संदेश यानिमित्ताने दिला जात आहे.
अर्थसोबत मातृत्वदिन साजरा करण्यासाठी कंपनीच्या संकेतस्थळाला भेट द्या. – www.arthbyemcure.com
व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा : View
About Emcure Pharmaceuticals Limited:


