पुणे दि. 16 : सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे या करिता सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. या कारणास्तव नागरिकांना शासनाच्या विविध योजना उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच त्यांच्या स्थनिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिवस हा शासन आपले दारी म्हणून आयोजित करण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने दि. 19 मे 2025 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत आमदार सिध्दार्थ शिरोळे विधानसभा सदस्य २०९ शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ व प्रकाश ढोरे नगरसेवक २०९ शिवाजी नगर विधान सभा मतदार संघ यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद शाळा बोपोडी (गावठाण) पुणे ता. पुणे शहर तहसिल कार्यालय पुणे शहर कार्यक्षेत्रात लोकशाही दिन घेण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी त्यांच्या समस्याबाबत लेखी स्वरुपात अर्ज सदर दिवशी दाखल करावेत असे तहसिलदार, पुणे यांनी कळविले आहे.
0000


