पुणे दि. 16 : राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे या पथकाने दिनांक 15 मे 2025 रोजी पुणे जिल्हयातील, पुरंदर तालुक्यातील, भोसलेवाडी येथील अवैध गावठी हातभटटी दारु निर्मातीच्या ठिकाणी अचानकपणे छापा मारुन 1400 लिटर रसायन, 1610 लिटर तयार गावठी हातभटी दारु, दारु निर्मीतीचे साहीत्य व एक चारचाकी वाहन असा एकुण अंदाजे रुपये 4 लाख 75 हजार किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला. या गुन्हयामध्ये दारु भटटी मालकाविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 अ.ब.क.ई. फ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.
या कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक व्हि.एम. माने, डी.एम. सस्ते, स.दु.नि अलिम शेख तसेच जवान एस.सी.भाट. आर.टी. तारळकर, पी.टी. कदम, एस.एस.पोंधे, ए.आर. थोरात जवान नि वाहनचालक ए.आर. दळवी यांनी सहभाग घेतला असून, सदर गुन्हयांचा पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक श्री. डी.एम. सस्ते हे करीत आहेत.
पुणे शहरातील नागरीकांना अवैध दारु निर्माती, वाहतुक व विक्री व्यवसायाशी संबंधीत माहिती असल्यास त्यांनी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी केले आहे.
0000


