Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedरूबी हॉल क्लिनिक तर्फे आंतरराष्ट्रीय पारिचारिका सप्ताह 2025 साजरा

रूबी हॉल क्लिनिक तर्फे आंतरराष्ट्रीय पारिचारिका सप्ताह 2025 साजरा

पुणे,16 मे 2025 : रूबी हॉल क्लिनिक,पुणे येथे 12 मे ते 17 मे 2025 दरम्यान आंतरराष्ट्रीय परिचारिका सप्ताह 2025 साजरा करण्यात आला. या सप्ताहात परिचारिकांच्या वचनबध्दता आणि करूणेचा सन्मान करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

आपल्या परिचारिका,आपले भविष्य – परिचारिकांची काळजी घेणे म्हणजे अर्थव्यवस्थेला मजबूत करणे (अवर नर्सेस अवर फ्युचर – केअरिंग फॉर नर्सेस स्ट्रेंदंस इकोनॉमीज्‌‍) ही या वर्षीची संकल्पना असून आठवड्याची सुरूवात 12 मे रोजी आर.एस.वाडिया ऑडिटोरियम येथे उद्घाटन समारंभाने झाली.या कार्यक्रमात परिचारिका आणि रूग्णालयातील नेतृत्वाने सक्रीय सहभाग घेतला.

याप्रसंगी रूबी हॉल क्लिनिकचे चीफ कार्डिओलॉजिस्ट,अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.परवेझ ग्रांट,समुह मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खोडाईजी,वैद्यकीय संचालक डॉ.प्रसाद मुगलीकर आणि विश्वस्त व फिजिशियन डॉ.सिमॉन ग्रांट उपस्थित होते.

या उपक्रमामध्ये पोस्टर्स स्पर्धा,सुरक्षित व दर्जेदार नर्सिंग पध्दतींवरील प्रश्नमंजुषा आणि सीपीआर व समुदाय कल्याणावर आधारित सीएसआर उपक्रम समाविष्ट होते.इतर वैशिष्टयांमध्ये अ सिंगल फ्रेम – लाऊड स्टोरी याने रूग्ण सुरक्षिततेकडे लक्ष वेधले.त्याचबरोबर एर्गोनॉमिक्स व आहार यावर आरोग्य कार्यशाळा आणि रुग्णांच्या सुरक्षिततेच्या जोखमींवर प्रकाश टाकणाऱ्या अनोख्या रूम ऑफ हॉरर उपक्रमाचा समावेश होता.

याचबरोबर आपली सर्जनशीलता दर्शवित परिचारिकांनी नर्सिंग उत्कृष्टता आणि सुरक्षिततेवरील नाविन्यपूर्ण कल्पना टेक युवर शॉट या कार्यक्रमात प्रदर्शित केल्या. यानंतर संध्याकाळी सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन केले गेले.या आठवड्याचा शेवट समारोप समारंभ व बक्षीस वितरणाने झाला,ज्यामध्ये नर्सिंग टीमच्या समर्पणाचा आणि कामगिरीचा गौरव करण्यात आला.

रूबी हॉल क्लिनिक येथील नर्सिंग सर्व्हिसेसच्या संचालिका मेजर रंजना विलियम्स (निवृत्त) म्हणाल्या की,परिचारिका या कुठल्याही आरोग्य सेवा संस्थेचा कणा असतात.रूग्णांच्या जीवनात त्या देत असलेल्या करूणामय सेवा आणि ताकद याची आठवण करून देणारा हा आठवडा आहे.

रूबी हॉल क्लिनिक परिचारिकांना सक्षम बनविण्याच्या आणि रूग्णसेवा आणि आरोग्यसेवेच्या प्रगतीमध्ये त्यांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्याच्या आपल्या वचनबध्दतेवर ठाम आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments