Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedआघाडी काळात अनेक भ्रष्टाचार झाले हे राज्याचे दुर्देव _ भाजप प्रदेश उपाध्यक्ष...

आघाडी काळात अनेक भ्रष्टाचार झाले हे राज्याचे दुर्देव _ भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी लेखक विनायक आंबेकर लिखित “किंगमेकर क्रॉनिकल_ वसुली व घोटाळ्याचे पर्व “पुस्तकाचे प्रकाशन

पुणे, प्रतिनिधी _
सन २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक नंतर निकाल आले आणि राज्यातील राजकारण बदलले गेले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युतीने एकत्रित त्या निवडणूक लढवल्या आणि निकालात आम्हाला १६१ जागा देखील मिळाल्या. त्यामुळे राज्यात सरकार युतीचे येणे आवश्यक होते. पण शिवसेनेने जनतेचा, भाजपचा विश्वासघात केला आणि उद्धव ठाकरे हे काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन आघाडी सोबत त्यांनी सरकार स्थापन केले. त्यांचा अडीच वर्षाचा कारभार हा दुर्देवी होता.कोरोना काळात तत्कालीन राज्य सरकार अपयशी ठरले. यादरम्यान अनेक भ्रष्टाचार झाले हे राज्याचे दुर्देव आहे असे मत भाजप नेते आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी व्यक्त केले आहे.

लेखक विनायक आंबेकर लिखित “किंगमेकर क्रॉनिकल_ वसुली व घोटाळ्याचे पर्व “पुस्तकाचे प्रकाशन भाजप नेते आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या हस्ते शनिवारी पार पडले. यावेळी भंडारी म्हणाले, किंगमेकर क्रॉनिकल हे पुस्तक आज प्रकाशित केले हे चांगले आहे. विनायक आंबेकर यांचे लेखन अभ्यासपूर्ण आहे. त्यांनी धर्मकन्या 2014 साली लिहिले. 2016 साली नोटबंदीवर देखील त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केले होते. मराठी मध्ये राजकीय विषया बाबत अभ्यासपूर्ण फारसे लिखाण येत नाही.राजकीय घटना कादंबरी स्वरूपात सर्वजण वाचतात. कादंबरीमध्ये थोडे विस्ताराने लिखाण करता येते. सर्व घटनामागील दडलेल्या गोष्टी, हितसंबंध, अंतस्थ हेतू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आंबेकर यांनी या पुस्तकातून केला आहे. आंबेकर यांनी हे लिखाण आज लिहिले नसून त्याची तयारी आधीच त्यांनी केली होती.

लेखक विनायक आंबेकर म्हणाले, विविध घटना बद्दल किंवा पंतप्रधान ते मुख्यमंत्री सर्वांबद्दल अर्वाच्च भाषेत बोलणारे असे का बोलतात ते जनतेने समजून घेणे आवश्यक आहे. असे करताना त्यांना जनतेपासून काय लपवयचंय हे जनतेला माहिती व्हावे या साठी हे पुस्तक लिहिले आहे. कोरोना काळ आणि महाविकास आघाडी काळातील घोटाळ्यांची साखळी या पुस्तकातून स्पष्ट केली आहे. मी जे लिखाण केले ते ज्या तथ्य गोष्टी दिसल्या त्याबाबत आणि त्यामागील भूमिका विशद केली आहे. जनतेसमोर आघाडी काळातील विविध घटनांमागील हितसबंधाची, बोगस कार्यपध्दतीची पूर्ण माहिती मिळावी हा माझा उद्देश आहे. एका व्यक्तीला असा भ्रम झाला आहे की,आपण बोलू ते सर्व सत्य आहे परंतु वस्तुस्थिती तशी नाही हे मी दाखवून दिले आहे. आघाडी सरकारच्या काळातील घोटाळ्यांच्या सर्व प्रकरणा मागील तथ्य या पुस्तकात मांडले गेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments