● या उपक्रमाचे उद्दिष्ट डिजिटल साक्षरता आणि रोजगारक्षमता कौशल्यांसह प्रतिवर्षी २५०० तरूणांना सक्षम करण्याचे, आयटी व रिटेल जॉब बाजारपेठेत तरूणांसाठी करियरच्या संधींचा विस्तार करण्याचे आहे
● पहिल्या टप्प्यातील यशावर उभारणी करणारा हा उपक्रम लिंग समानतेला चालना देऊन ६० टक्के जॉब प्लेसमेंट देईल. त्यात ५० टक्के महिलांचा सहभाग असेल.
बंगळुरू – १९ मे २०२५: फ्लिपकार्ट ग्रुपची धर्मादाय शाखा असलेल्या फ्लिपकार्ट फाउंडेशनने प्रथम इन्फोटेक फाउंडेशन (पीआयएफ) सोबत आपले सहकार्याचा विस्तार करत मुंबई आणि गुरुग्राममध्ये ‘डिजिटल साक्षरता आणि २१ व्या शतकातील रोजगारक्षमतेसाठी कौशल्ये’ कार्यक्रमाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट १८ ते ३५ वयोगटातील आर्थिकदृष्ट्या वंचित तरुणांना नोकरीची तयारी वाढवण्यासाठी आवश्यक डिजिटल आणि सॉफ्ट स्किल्सने सुसज्ज करणे आहे. हा कार्यक्रम डिजिटल प्रशिक्षण, तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि थेट रोजगार दुवे देणाऱ्या एका हायब्रिड लर्निंग मॉडेलचे अनुसरण करतो.
पहिल्या टप्प्यात विविध क्षेत्रांमध्ये अंदाजे २,४०० व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून दिला आणि ३,९०० तरुणांना प्रशिक्षण दिले. त्यावर आधारित राहून दुसऱ्या टप्प्यात दरवर्षी दहा समुदाय-आधारित केंद्रांमध्ये अतिरिक्त २,५०० तरुणांना सुसज्ज करण्याचे उद्दिष्ट आहे. सहभागींना लॅपटॉप आणि इतर डिजिटल शिक्षण साधने दिली जातील आणि डिजिटल साक्षरता, सॉफ्ट स्किल्स आणि व्यावसायिक सौंदर्याचे व्यापक प्रशिक्षण घेतले जाईल. त्याचा अप्रत्यक्ष लाभांसह १०,००० व्यक्तींवर सकारात्मक परिणाम होईल.
या उपक्रमात रोजगाराच्या संधी सुलभ करण्यासाठी मार्गदर्शन, प्लेसमेंटपूर्व प्रशिक्षण आणि नोकरी मेळावे देखील आयोजित केले जातात. त्यांचे लक्ष्य किमान ६०% नोकरी प्लेसमेंट दर आहे. लिंग समावेशकतेवर लक्ष केंद्रित करून या उपक्रमातून सहभागींपैकी किमान ५०% महिला असतील याची काळजी घेतली जाते. त्यामुळे नोकरीच्या संधींमध्ये समान प्रवेश मिळतो.
या सहकार्याबद्दल बोलताना फ्लिपकार्टच्या कॉर्पोरेट अफेयर्सच्या उपाध्यक्ष सारा गिडॉन म्हणाल्या, “प्रगतीचे खरे माप केवळ तंत्रज्ञानाची उपलब्धता नाही, तर अर्थपूर्ण संधी निर्माण करण्यासाठी त्याचा वापर करण्याची क्षमता आहे. फ्लिपकार्ट फाउंडेशनमध्ये आम्ही डिजिटल साक्षरतेला रोजगार, स्वातंत्र्य आणि दीर्घकालीन आर्थिक गतिशीलतेचे प्रवेशद्वार म्हणून पाहतो. प्रथम इन्फोटेक फाउंडेशनसोबतचे आमचे सहकार्य प्रशिक्षणाच्या पलीकडे जाते, तरुणांना शाश्वत करिअर घडविण्यासाठी आत्मविश्वास, कौशल्ये आणि नेटवर्कसह सुसज्ज करते. या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात प्रवेश करताना आम्ही ग्राऊंडवर, समाजात आणि ज्यांना त्याची सर्वात जास्त गरज आहे त्यांच्या जीवनात खरा फरक घडवण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
प्रथम इन्फोटेक फाउंडेशनचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेम यादव म्हणाले, “देशाच्या भविष्यासाठी मजबूत डिजिटल आणि रोजगारक्षमता कौशल्यांची आवश्यकता असते. प्रथम इन्फोटेक फाउंडेशनमध्ये आम्ही या आवश्यक क्षमतांसह तरुणांना सक्षम करण्यासाठी वचनबद्ध आहोत. फ्लिपकार्ट फाउंडेशनसोबतचे आमचे सहकार्य आम्हाला अर्थपूर्ण रोजगार मार्ग निर्माण करण्यास आणि साधनांची कमतरता असलेल्या वर्गांमध्ये शाश्वत प्रभाव पाडण्यास सक्षम करते.”
या उपक्रमाअंतर्गत प्रमुख अंमलबजावणी घटकांमध्ये केंद्रांवर डिजिटल पायाभूत सुविधा उभारणे, स्थानिक तज्ञांना प्रशिक्षक म्हणून नियुक्त करणे व प्रशिक्षण देणे आणि नोकरीच्या तयारीसाठी प्री-प्लेसमेंट सत्रे आयोजित करणे यांचा समावेश आहे. या प्रयत्नांचा एकत्रित उद्देश डिजिटल दरी भरून काढणे आणि आजच्या नोकरीच्या बाजारात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांनी तरुणांना सक्षम करणे आहे.
मागील काही वर्षांत फ्लिपकार्ट फाउंडेशनने आंध्र प्रदेश, आसाम, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये जास्तीत जास्त पोहोच आणि शाश्वत परिणाम सुनिश्चित करण्यासाठी विविध हस्तक्षेपांद्वारे समाजातील वंचित घटकांची सेवा, समर्थन आणि सक्षमीकरण करण्यासाठी काम केले आहे
फ्लिपकार्ट फाऊंडेशन आणि प्रथम इन्फोटेक फाऊंडेशनकडून मुंबई आणि गुरूग्राममधील तरूणांच्या सक्षमीकरणासठी आपल्या डिजिटल साक्षरता उपक्रमाचा विस्तार
RELATED ARTICLES


