Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedडीईई डेव्हलपमेंट इंजिनीअर्सला जागतिक तेल व वायू कंपनीकडून मोठे आंतरराष्ट्रीय कंत्राट प्राप्त

डीईई डेव्हलपमेंट इंजिनीअर्सला जागतिक तेल व वायू कंपनीकडून मोठे आंतरराष्ट्रीय कंत्राट प्राप्त

नवी दिल्ली, 19 मे २०२५ : डीईई डेव्हलपमेंट इंजिनीअर्स लि. (डीडीईएल) या अॅडव्हान्स्ड प्रोसेस पाइपिंग सोल्युशन्स पुरविणाऱ्या आघाडीच्या कंपनीला एका प्रमुख आंतरराष्ट्रीय तेल व वायू कंपनीकडून महत्त्वाचे कंत्राट मिळाले आहे. ‘डीडीईएल’ने काही व्यावसायिक कारणास्तव आपल्या या ग्राहकाचे नाव गोपनीय ठेवले आहे, तथापि हे कंत्राट ‘डीडीईएल’च्या आंतरराष्ट्रीय विस्ताराच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

या कंत्राटानुसार, संबंधित ग्राहक कंपनीच्या जागतिक प्रकल्पांसाठी ‘डीडीईएल’तर्फे प्रोसेस पाइपिंग सोल्युशन्स नियमितपणे पुरविण्यात येतील. त्यामुळे ‘आंतरराष्ट्रीय ऊर्जा कंपन्यांचे पसंतीचे विक्रेते’ अशी ‘डीडीईएल’ची ओळख अधिक बळकट होईल.

या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना, ‘डीईई डेव्हलपमेंट इंजिनीअर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कृष्णन ललित बन्सल म्हणाले, “डीडीईएल’च्या तांत्रिक कौशल्यावर, प्रकल्प अंमलबजावणीच्या क्षमतेवर आणि गुणवत्तेच्या निर्धारावर मोठा विश्वास व्यक्त करण्यात आला असून हे कंत्राट हे त्याचे प्रतीक आहे. आमची जागतिक दर्जाची अभियांत्रिकी सोल्युशन्स प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या धोरणाशी हा करार सुसंगत आहे. तसेच, ऊर्जा-केंद्रित भव्य पायाभूत प्रकल्पांमध्ये आमचा महत्त्वपूर्ण सहभाग वाढवण्याची संधीही यातून आम्हाला मिळाली आहे.”

कंपनीच्या संचालिका शिखा बन्सल म्हणाल्या, “हा जागतिक स्तरावरील सन्मान ही ‘मेक इन इंडिया’ उपक्रमातील आमच्या योगदानाची पावती आहे. भारतीय उत्पादन व अभियांत्रिकी कौशल्याचे जागतिक स्तरावर सशक्त प्रतिनिधित्व करण्याचा आमचा उद्देश या करारातून अधोरेखित होतो. भारताला उच्च-गुणवत्तेच्या, अचूकतेवर आधारित अभियांत्रिकी सोल्युशन्ससाठी एक जागतिक केंद्र म्हणून उभे करण्याच्या आमच्या ध्येयाला हे कंत्राट बळकटी देईल.”

या भागीदारीचे काही महत्त्वाचे मुद्दे :

· ‘डीडीईएल’ला दरवर्षी लक्षावधी डॉलर्सच्या ऑर्डर्स नियमितपणे मिळतील,

· तेल व वायू उद्योगाच्या जागतिक बाजारात ‘डीडीईएल’चे विशिष्ट स्थान निर्माण होईल,

· आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वारंवार होणाऱ्या व्यवहारांमुळे ‘डीडीईएल’चा दबदबा वाढेल,

· जागतिक स्तरावरीव विद्यमान व आगामी प्रकल्पांमध्ये ‘डीडीईएल’ची सोल्युशन्स अंमलात येतील.

हा करार कंपनीच्या दीर्घकालीन मूल्यनिर्मितीला आणि सातत्यपूर्ण वाढीच्या प्रवासाला निश्चितच मोठा हातभार लावणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments