Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedमधुमेह,स्थूलता,फॅटी लिव्हर तपासणी शिबीर

मधुमेह,स्थूलता,फॅटी लिव्हर तपासणी शिबीर

एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे येथे दि. 22,23 व 24 मे रोजी दररोज 2 ते 5 या वेळेत मधुमेह, स्थूलता , फॅटी लिव्हर या आजारांसाठी विनामूल्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे. तज्ञ फिजिशियन डॉक्टर व आयुर्वेद तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व सल्ला मोफत असणार आहे. तसेच नागरिकांना जीवनशैलीतील सुधारणा, आहार नियंत्रण याविषयीही या शिबिरात मार्गदर्शन केले जाणार आहे.

मधुमेह, उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर यांसारखे अनेक आजार सुरुवातीला लक्षात येत नाहीत. परंतु शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना या आजारांचे लवकर निदान होऊन वेळेत उपचार मिळू शकतात. तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन एस हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.सागर पाटणकर यांनी केले आहे. एस हॉस्पिटल, एरंडवणे पुणे मार्फत जनतेला आरोग्यदृष्ट्या सक्षम बनविण्याकरिता आणि समाजात आरोग्याविषयी सकारात्मकता निर्माण करण्याकरिता अशी आरोग्य शिबिरे सतत आयोजित केली जातात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments