मुंबई, २० मे २०२५ – पडदा उठवण्यात आला, टेबल सेट करण्यात आला आणि फूडच्या भविष्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुंबईतील एका भव्य प्रदर्शनामध्ये गोदरेज विक्रोळी कुसिनाने भारतीयांनी कधीच कल्पना न केलेल्या पद्धतीत सर्वोत्तम फूड थिएटर परफॉर्मन्स ‘फिस्ट फॉर द फ्यूचर’च्या माध्यमातून गोदरेज फूड ट्रेण्ड्स रिपोर्ट (जीएफटीआर) २०२५च्या आठव्या एडिशनला लाँच केले. थीम ‘सीझन्स’ असलेल्या यंदाचे एडिशन समकालीन भाषण किंवा स्लाइड्स ऐवजी कथानक, व्यंगचित्र आणि संवेदनशील नाटकाच्या माध्यमातून अनावरण करण्यात आले, ज्यांनी आठवण, ओळख व भावना म्हणून फूडला साजरे केले.
शेफ्स, न्यूट्रिशनिस्ट्स, मिक्सॉलॉजिस्ट्स, फूड राइटर्स आणि उद्योजकांसह १९० हून अधिक कलिनरी वॉइसेसच्या योगदानावर आधारित अहवालाचे २०२५ एडिशन भारतातील विकसित होत असलेल्या फूड व बेव्हरेज लँडस्केपला आकार देणाऱ्या ट्रेंड्सबाबत सखोल माहिती देते. सीझनेलिटीला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे, जेथे ८२ टक्के तज्ञ स्थानिक, हंगामी उत्पादन व सांस्कृतिकदृष्ट्या रूजलेल्या घटकांवर नवीन ग्राहक फोकसला प्रकाशझोतात आणतात. या सुधारणेचा डायनिंगपासून होम कूकिंगपर्यंत प्रत्येक गोष्टीवर प्रभाव पडत आहे, ज्यामधून सर्वोत्तम, वेळ-व-ठिकाण आधारित भोजनाचा आस्वाद घेण्याचा आनंद परतत असल्याचे दिसून येते.
या थीमबाबत मत व्यक्त करत गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड व असोसिएट कंपनीजच्या कार्यकारी संचालक व चीफ ब्रँड ऑफिसर तान्या दुबाश म्हणाल्या: “गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपमध्ये फूड उदरनिर्वाहापेक्षा अधिक संस्कृती, ओळख, आठवण आणि शक्यता आहे. हा विश्वास इनसाइट व संकल्पनांचा आमचा वार्षिक अहवाल गोदरेज फूड ट्रेण्ड्स रिपोर्टला पाठिंबा देतो. २०१८ पासून २,००० हून अधिक फूड तज्ञांकडून माहितीसह या अहवालाने अर्थपूर्ण भोजन व पाककलासंदर्भातील जुन्या आठवणींपासून स्वदेशी घटकांच्या उदयापर्यंत आमच्या विकसित होत असलेल्या लँडस्केपच्या प्रत्येक पैलूला कॅप्चर केले आहे. आज हा अहवाल अधिक मोठी भूमिका बजावतो. जीएफटीआर धोरणात्मक दृष्टिकोनामध्ये बदलला आहे, ज्याद्वारे नवीन उत्पादने, मेनू व फूड कथानकांना आकार मिळत आहे. यंदा, आम्ही सीझनेलिटीच्या थीमला एक्स्प्लोअर करत आहोत. संपूर्ण विश्व प्रामाणिकपणा व शाश्वततेला अंगिकारत असताना आमच्यासाठी एकेकाळी दुसरा पैलू असलेले सीझनल खाणे आता अर्थपूर्ण पुनरागमन करत आहे.”
गोदरेज फूड्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय पारनेरकर म्हणाले: “गोदरेज फूड्स लिमिटेडमध्ये आम्हाला अशा प्रभावशाली, संस्कृती-अग्रगण्य स्वरूपामध्ये गोदरेज फूड ट्रेण्ड्स रिपोर्ट २०२५ सादर करण्यासाठी विक्रोळी कुसिनासोबत सहयोग करण्याचा अभिमान वाटतो. भारतातील किचन्समध्ये सामावलेली फूड कंपनी म्हणून उदयोन्मुख ग्राहक पसंतींना समजून घेणे उत्पादन विकासापासून ब्रँड कथानकापर्यंत आम्ही करणाऱ्या नाविन्यतेसाठी महत्त्वाचे आहे. जीएफएलमध्ये आमच्यासाठी हा सहयोग अग्रस्थानी राहण्यासोबत माहिती देणाऱ्या व प्रेरित करणाऱ्या स्वरूपामध्ये भारतातील संपन्न पाककला वारसाला प्रशंसित करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो.”
क्रिमलाइन डेअरी प्रॉडक्ट्स लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र सुरी म्हणाले: “डेअरी घटकापेक्षा अधिक असून शुद्धतेचे सार आणि आमच्या पाककला परंपरांचा आधारस्तंभ आहे. क्रिमलाइन डेअरी प्रॉडक्ट्समध्ये आम्हाला हा वारसा कायम ठेवण्याचा अभिमान वाटतो, जेथे आम्ही प्रत्येक ऑफरिंगमधून विश्वास व पोषण दिसून येण्याची खात्री घेत आहोत, ज्यांना भारतीय कुटुंबं पिढ्यानपिढ्या प्राधान्य देत आले आहेत. विक्रोळी कुसिना आणि गोदरेज फूड ट्रेण्ड्स रिपोर्ट २०२५ सोबतचा सहयोग हा सन्मान आहे, जो अस्सलता आणि अर्थपूर्ण सेवनामध्ये अग्रस्थानी असण्याच्या आमच्या दृष्टिकोनाशी संलग्न आहे. हा सहयोग फूडच्या सांस्कृतिक महत्त्वाला साजरे करतो, तसेच आधुनिक जीवनशैलींमध्ये डेअरीच्या विकसित होत असलेल्या भूमिकेबाबत अर्थपूर्ण संवादांना चालना देतो.”
२०२५ एडिशनसह गोदरेज विक्रोळी कुसिना फूडबाबतच्या चर्चेसोबत आपण अर्थपूर्णपणे फूडशी संलग्न होण्याच्या पद्धतीमध्ये नवीन बेंचमार्क स्थापित करते. ‘द फ्यूचर फिस्ट’वर भर दिला जात असताना एक गोष्ट स्पष्ट होती की, भारतातील फूडचे भविष्य विचारशील असण्यासोबत नाट्यमय देखील आहे.
गोदरेज फूड ट्रेण्ड्स रिपोर्ट २०२५ डाऊनलोडसाठी www.vikhrolicucina.com येथे उपलब्ध आहे.


