Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedहोंडा मोटरसायकल अँड स्‍कूटर इंडियाकडून ऑल-न्‍यू एक्‍स-एडीव्‍ही लाँच 'बुकिंग्‍जना सुरूवात'

होंडा मोटरसायकल अँड स्‍कूटर इंडियाकडून ऑल-न्‍यू एक्‍स-एडीव्‍ही लाँच ‘बुकिंग्‍जना सुरूवात’

गुरूग्राम, २१ मे २०२५: प्रीमियम दुचाकी क्षेत्रात साहसी झेप घेत होंडा मोटरसायकल अँड स्‍कूटर इंडिया (एचएमएसआय)ने आज ऑल-न्‍यू एक्‍स-एडीव्‍ही लाँच केली. साहसी मोटरसायकलच्‍या शक्तिशाली उत्‍साहासह मॅक्‍सी-स्‍कूटरच्‍या व्‍यावहारिकतेचे संयोजन असलेली एक्‍स-एडीव्‍ही स्‍वत:चा अद्वितीय दर्जा स्‍थापित करते. एक्‍स-एडीव्‍हीसाठी बुकिंग्‍जना आता भारतभरातील होंडाच्‍या बिगविंग डिलरशिप्‍समध्‍ये सुरूवात झाली आहे आणि ग्राहकांना डिलिव्‍हरीज जून २०२५ पासून सुरू होतील. ऑल-न्‍यू एक्‍स-एडीव्‍हीची किंमत ११.९० लाख रूपये, एक्‍स-शोरूम गुरूग्राम (हरियाणा) आहे.
या लाँचची घोषणा करत होंडा मोटरसायकल अँड स्‍कूटर इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक, अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. त्‍सुत्‍सुमू ओटानी म्‍हणाले, ”होंडामध्‍ये आम्‍ही मोटरसायकलिंग अनुभवाला नव्‍या उंचीवर नेण्‍यासाठी सतत समकालीन पैलूंना आव्‍हान करतो. एक्‍स-एडीव्‍ही नाविन्‍यता आणि डिझाइन उत्‍क्रांतीचे प्रतीक आहे. ही मशिन साहसी व शहरी गतीशीलतेमधील मर्यादांना दूर करते. अद्वितीय स्‍टायलिंग, वैविध्‍यपूर्ण कार्यक्षमता आणि प्रगत तंत्रज्ञानांसह एक्‍स-एडीव्‍ही दुचाकींवर नवीन अनुभवांचा शोध घेणाऱ्यांसाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, ही मोटरसायकल भारतातील प्रीमियम मोटरसायकल उत्‍साहींच्‍या नवीन सेगमेंटचे लक्ष वेधून घेईल.”
या घोषणेबाबत मत व्‍यक्‍त करत होंडा मोटरसायकल अँड स्‍कूटर इंडियाच्‍या सेल्‍स अँड मार्केटिंगचे संचालक श्री. योगेश माथूर म्‍हणाले, ”एक्‍स-एडीव्‍हीचे लाँच आमच्‍या बिगविंग प्रवासामधील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्‍पा आहे, जेथे आम्‍ही आमच्‍या प्रीमियम मोटरसायकल पोर्टफोलिओला विस्‍तारित करत आहोत. साहसी क्षमता आणि शहर-अनुकूल गतीशीलतेच्‍या परिपूर्ण एकत्रिकरणासह एक्‍स-एडीव्‍ही रोमांचक व साहसी राइडचा अनुभव देईल. कामकाजाच्‍या दिवसांमध्‍ये प्रवास करायचा असो किंवा वीकेण्‍डला साहसी राइडचा आनंद घ्‍यायचा असो ही क्रॉसओव्‍हर मशिन अद्वितीय व्‍यावहारिकता व कार्यक्षमता देते, ज्‍यामधून सर्व स्‍तरांवर उत्तम सुविधेची खात्री मिळते. आम्‍ही या अद्वितीय अनुभवाचा आनंद घेण्‍यासाठी आमच्‍या बिगविंग डिलरशिप्‍समध्‍ये राइडर्सचे स्‍वागत करण्‍यास उत्‍सुक आहोत.”
ऑल-न्‍यू होंडा एक्‍स-एडीव्‍ही: साहसी राइडचा आनंद घ्‍या
ऑल-न्‍यू होंडा एक्‍स-एडीव्‍ही तिच्‍या फ्यूचरिस्टिक क्रॉसओव्‍हर स्‍टायलिंगसह डिझाइनला नव्‍या उंचीवर घेऊन जाते, ज्‍यामध्‍ये अॅडव्‍हेंचर टूररची प्रबळता आणि शहरी प्रवाशांचा उत्साह यांचे संयोजन आहे. या मोटरसायकलमध्‍ये प्रीमियम फ्रण्‍टल सिग्‍नेचरसह ड्युअल एलईडी हेडलाइट्स आहेत, ज्‍यामधून आकर्षक, आधुनिक लुक दिसून येतो. यामध्‍ये उच्‍च दृश्‍यमानता देणारे डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल) आहेत, ज्‍यामध्‍ये टर्न इंडिकेटर्स देखील आहेत, ज्‍यामधून आकर्षक, पण उद्देशपूर्ण फ्रण्‍ट प्रोफाइल दिसून येतो.
एक्‍स-एडीव्‍हीची डिझाइन लक्षवेधक असण्‍यासोबत व्‍यावहारिक आहे. ग्राऊंड रिच सोपे करण्‍यासाठी सीटला काळजीपूर्वक नवीन आकार देण्‍यात आला आहे, तर जाड यूरेथेन पॅडिंग लांब अंतरापर्यंत प्रवासादरम्‍यान आरामदायीपणा देते. सीटच्‍या खाली एैसपैस २२-लीटर स्‍टोरेज जागा आहे, जी हेल्‍मेट किंवा दैनंदिन आवश्‍यक गोष्‍टी ठेवण्‍यासाठी अनुकूल आहे आणि या मोटरसायकलमध्‍ये अतिरिक्‍त सोयीसुविधेसाठी यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट देखील आहे. राइडर्स आकर्षक रंगसंगतींमधून निवड करू शकतात, जे प्रबळ व्‍यक्तिमत्त्वाशी पूरक आहेत. हे रंग आहेत पर्ल ग्‍लेअर व्‍हाइट आणि ग्रॅफाईट ब्‍लॅक, जे एक्‍स-एडीव्‍हीच्‍या डायनॅमिक डिझाइनमध्‍ये अद्वितीय विशिष्‍टतेची भर करतात.
आधुनिक काळातील एक्‍स्‍प्‍लोरर्सना लक्षात घेऊन डिझाइन करण्‍यात आालेल्‍या एक्‍स-एडीव्‍हीमध्‍ये ५-इंच फुल-कलर टीएफटी डिस्‍प्‍ले आहे, जो सुस्‍पष्‍ट व्हिज्‍युअल्‍स आणि अनेक सानुकूल माहिती देतो. यामध्‍ये होंडा रोडसिंक अॅप कनेक्‍टीव्‍हीटी आहे, ज्‍यामुळे राइडर्स कॉल व एसएमएस अलर्ट्स मिळवू शकतात, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन उपलब्‍ध होते, म्‍युझिक व वॉईस कमांड्सवर नियंत्रण ठेवता येते. या सर्व गोष्‍टी राइडिंग करताना व्‍यवस्‍थापित करता येऊ शकतात.
एक्‍स-एडीव्‍ही शक्तिशाली ट्यूबलर स्‍टील फ्रेमवर निर्माण करण्‍यात आली असून विविध रस्‍त्‍यांवर सहजपणे राइडिंग करता येण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. पुढील बाजूस ४१ मिमी यूएसडी (अपसाइड डाऊन) फोर्क्‍स आहेत, तर मागील बाजूस उच्‍च दर्जाच्‍या राइड आरामदायीपणासाठी स्प्रिंग प्रीलोड अॅडजस्‍टेबल मोनोशॉक आहे. १७-इंच फ्रण्‍ट व १५-इंच रिअर वायर-स्‍पोक व्‍हील्‍स असलेली एक्‍स-एडीव्‍ही शहरातील रस्‍ते व खडतर प्रदेशांमध्‍ये राइडिंग करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. ब्रेकिंग सेटअपमध्‍ये ड्युअल रॅडियल माऊंट फोर-पिस्‍टन कॅलिपर्स असण्‍यासोबत पुढील बाजूस २९६ मिमी डिस्‍क्‍स आणि मागील बाजूस सिंगल पिस्‍टन कॅलिपर २४० मिमी डिस्‍क आहे, जे प्रबळ स्‍टॉपिंग पॉवर देतात, ज्‍याला पूरक ड्युअल-चॅनेल एबीएस आहे.
होंडा एक्‍स-एडीव्‍हीची खासियत म्‍हणजे ७४५ सीसी लिक्विड-कूल्‍ड एसओएचसी ८-व्‍हॉल्‍व्‍ह पॅरेलल-ट्विन इंजिन, जे कमी ते मध्‍यम रेंजपर्यंत प्रबळ कार्यक्षमता देण्‍यासाठी ट्यून करण्‍यात आले आहे आणि शहरातील क्रूझिंग, तसेच साहसी राइडिंगसाठी अनुकूल आहे. हे इंजिन ६,७५० आरपीएममध्‍ये ४३.१ केडब्‍ल्‍यू शक्‍ती आणि ४,७५० आरपीएममध्‍ये ६९ एनएम अधिकतम टॉर्कची निर्मिती करते, ज्‍यामधून सर्व प्रदेशांमध्‍ये सुलभ व प्रतिसादात्‍मक अॅक्‍सेलरेशन मिळते. पॉवरट्रेनला पूरक होंडाचे प्रतिष्ठित ड्युअल क्‍लच ट्रान्‍समिशन (डीसीटी) आहे, जे विनासायासपणे गिअर शिफ्ट्स देते.
राइड-बाय-वायर तंत्रज्ञान थ्रॉटल प्रतिसादाचे व्‍यवस्‍थापन करते, जे चार डिफॉल्‍ट राइडिंग मोड्स देते – स्‍टॅण्‍डर्ड, स्‍पोर्ट, रेन आणि ग्रॅव्‍हल. हे प्रत्‍येक मोड राइडरच्‍या गरजांनुसार पॉवर डिलिव्‍हरी, इंजिन ब्रेकिंग आणि ट्रॅक्‍शन कंट्रोल समायोजित करते. तसेच, युजर मोड आहे, जो बी-स्‍पोक कस्‍टमायझेशन देतो, राइडर्सना साहसी राइडचा अनुभव देतो. एक्‍स-एडीव्‍हीमध्‍ये विविध रस्‍त्‍यांवर सानुकूल घर्षणासाठी होंडा सिलेक्‍टेबल टॉर्क कंट्रोल (एचएसटीसी) आहे आणि क्रूझ कंट्रोल देखील आहे.
ऑल-न्‍यू एक्‍स-एडीव्‍ही: किंमत व उपलब्‍धता
ऑल-न्‍यू होंडा एक्‍स-एडीव्‍हीची किंमत ११.९० लाख रूपये (एक्‍स-शोरूम गुरूग्राम, हरियाणा) आहे. ही मोटरसायकल फक्‍त भारतभरातील बिगविंग डिलरशिप्‍सच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध असेल. अद्वितीय क्रॉसओव्‍हर अपीलसह एक्‍स-एडीव्‍ही भारतातील प्रीमियम दुचाकी क्षेत्रात नवीन मापदंड स्‍थापित करण्‍यास सज्‍ज आहे. बुकिंग्‍जना आता सुरूवात झाली आहे, तसेच डिलिव्‍हरीजना जून २०२५ पासून सुरूवात होईल. ही मोटरसायकल होंडा बिगविंग इंडियाच्‍या अधिकृत वेबसाइटच्‍या (www.HondaBigWing.in) माध्‍यमातून ऑनलाइन देखील बुक करता येऊ शकते.
मॉडेल
किंमत (एक्‍स-शोरूम गुरूग्राम)
होंडा एक्‍स-एडीव्‍ही
रू. ११.९० लाख

अधिक माहितीसाठी संपर्क साधा: corporate.communications@honda.hmsi.in

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments