Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedअंगणातल्या खेळांना पालक-मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ...

अंगणातल्या खेळांना पालक-मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ यांनीही खेळले अंगणातले खेळ

पुणे : पावसाची भुरभूर असतानाही लगोरी, टिपरीपाणी असे खेळ खेळणारी मुले, भोवरा फिरवण्याचा प्रयत्न करणारी मुले, स्वतः उत्साहाने भोवरा फिरवणारे आजोबा, अंगणातल्या खेळांविषयी मुलांना माहिती सांगणारे पालक… उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनाही खेल खेळण्याचा न आवरता आलेला उत्साह असे वातावरण पुणे बालपुस्तक जत्रेत गुरुवारी होते.

राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, संवाद पुणे यांच्यातर्फे आयोजित पुणे बालपुस्तक जत्रेचे उद्घाटन गणेश कला क्रीडा मंच येथे झाले. विशेष म्हणजे, या जत्रेच्या उद्घाटनाच्या आधीच पुणेकरांनी गर्दी केली. सकाळपासूनच मुले, पालकांनी जत्रेला हजेरी लावली. जत्रेमध्ये बालकुमार साहित्याची ७०हून अधिक दालने आहेत. त्याशिवाय अंगणातील खेळ, खाऊची दुकाने, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम या जत्रेत होत आहेत. आताच्या काळात संगणक आणि स्मार्टफोनमध्ये रमणाऱ्या मुलांना पुस्तके, खेळाची गोडी लावण्याचा या जत्रेचा उद्देश आहे.

‘आम्ही आमच्या लहानपणी अंगणात, वाड्यात खेळ खेळताना तहानभूक विसरून जात होतो. मात्र, आता फ्लॅट संस्कृती, इंटरनेटमुळे अंगणातल्या खेळांचा विसर पडल्यासारखे झाले आहे. मात्र, नव्या पिढीला या खेळांची माहिती झाली पाहिजे. पुणे बालपुस्तक जत्रेने या खेळांचा समावेश करून जुन्या काळाचा पुन्हा आनंद दिला, अशी भावना पालकांनी व्यक्त केली.

चौकट

जितेंद्र रघुवीर यांच्या
जादूची धमाल

उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर जादुगार जितेंद्र रघुवीर यांचा जादूच्या खेळांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात रघुवीर यांनी अनोख्या अनेक जादूंचे सादरीकरण केले. मुले, पालकांनी या जादूची धमाल अनुभवली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments