Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedमिलेट पदार्थांच्या जनजागृतीसाठी मिलिमोचा पुढाकार*

मिलेट पदार्थांच्या जनजागृतीसाठी मिलिमोचा पुढाकार*

*
पालकांच्या धकाधकीच्या जीवनशैली मुळे लहान मुलांच्या खाण्यापिण्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. फास्ट फूड, रेडी टू कुक आहे म्हणून मैदायुक्त पदार्थांचा अनेकदा लहान मुलांच्या खाण्यात जास्त वापर होताना दिसतो, मात्र या पदार्थांचा लहान मुलांच्या आरोग्यावर होणार परिणाम   काय असेल? यांचा विचार पालक करताना दिसत नाहीत. यामुळेच पालक आणि मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी गणेश कला येथे सुरू असलेल्या बाल पुस्तक जत्रेत तब्बल 12 हजार फूड पॅकेटचे मोफत वितरण करण्यात येत आहे.  सोनाई एक्सपोर्ट प्रा. लि. च्या संचालिका तृप्ती पाटील यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. , या उपक्रमाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments