Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedसामाजिक कार्यकर्त्या जयश्री देशपांडे ‘राणी लक्ष्मीबाई पुरस्काराने सन्मानित व्यसनमुक्त युवक संघ,...

सामाजिक कार्यकर्त्या जयश्री देशपांडे ‘राणी लक्ष्मीबाई पुरस्काराने सन्मानित व्यसनमुक्त युवक संघ, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पुरस्कार

पुणे : व्यसनमुक्त युवक संघ, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जयश्री देशपांडे यांना ‘राणी लक्ष्मीबाई पुरस्कार ’ प्रदान करण्यात आला. जयश्री देशपांडे या वृद्धांच्या सेवेसाठी निरंतर कार्यरत असतात. नारद मंदिर येथील सचिव पदावर मागील २५ वर्षे त्या कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या समुपदेशातून अनेक स्त्रियांचे संसार पुन्हा नव्याने उभे राहिले आहेत.

सदाशिव पेठेत राहणाऱ्या जयश्री देशपांडे यांनी ‘सुवास केटरिंग सर्व्हिसेस’ या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून गरजू, वृद्ध, अपंग, विधवा, अनाथ अशा अनेकांना मोफत जेवण व अन्नधान्याचे वाटप करत मदतीचा हात दिला आहे. कोरोना काळात त्यांनी आपल्या सेवा खंडित न करता गरजूंना आधार दिला.

त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत व्यसनमुक्त युवक संघाने त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम रुपये ११ हजार असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी संघाचे प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेनापती कापशी कोल्हापूर येथे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments