Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedकनोडिया सिमेंट लिमिटेडने सेबीकडे डीआरएचपी सादर केला

कनोडिया सिमेंट लिमिटेडने सेबीकडे डीआरएचपी सादर केला

कनोडिया सिमेंट लिमिटेड (“कंपनी”) ही उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांमध्ये सॅटेलाइट ग्राइंडिंग युनिट्स (“SGUs”)द्वारे ऑपरेट होणारी सिमेंट उत्पादक कंपनी आहे आणि पोर्टलँड पोजोलाना सिमेंट व कॉम्पोझिट सिमेंटसारख्या मिश्रित सिमेंटच्या उत्पादनात विशेषज्ञ आहे. कंपनीने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“DRHP”) बाजार नियामक भारतीय प्रतिभूती आणि बाजार आयोगाकडे (“सेबी”) सादर केले आहे.

कंपनी प्रारंभिक सार्वजनिक ऑफरद्वारे इक्विटी शेअर कॅपिटल विक्रीच्या माध्यमातून निधी उभारण्याचा मानस ठेवते. सार्वजनिक ऑफरमध्ये प्रत्येक ₹10 चे फेस व्हॅल्यू असलेल्या जास्तीतजास्त 14,913,930 इक्विटी शेअर्सचा ‘ऑफर फॉर सेल’ समाविष्ट आहे.

क्रिसिल अहवालानुसार, कनोडिया सिमेंट ही भारतातील सिमेंटच्या कंत्राटी उत्पादनात अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे. 31 डिसेंबर 2024 पर्यंत कंपनीकडे पाच सॅटेलाइट ग्राइंडिंग युनिट्स (“SGUs”) आहेत, ज्यांची एकूण सिमेंट उत्पादन क्षमता 3.54 MTPA आहे. आर्थिक वर्ष 2014 ते आर्थिक वर्ष 2024 दरम्यान, कंपनीची सिमेंट ग्राइंडिंग क्षमता वार्षिक सरासरी वाढदर (CAGR) 22.12% ने वाढली आहे, जी उद्योगातील सरासरी 7.31% आणि समकक्ष कंपन्यांची सरासरी 9.64% यांपेक्षा लक्षणीय जास्त आहे. या काळात कंपनी ही स्थापनेच्या दृष्टीने भारतातील सर्वात जलद वाढणाऱ्या सिमेंट उत्पादकांपैकी एक ठरली आहे. (स्रोत: CRISIL अहवाल)

तसेच आर्थिक वर्ष 2022 ते 2024 दरम्यान, कंपनी विक्रीच्या प्रमाणातही वार्षिक सरासरी वाढदर 36.14% ने वाढली आहे, जे उद्योगातील सरासरी 11.10% आणि समकक्ष कंपन्यांच्या 8.80% पेक्षा जास्त आहे. (स्रोत: CRISIL अहवाल)

याशिवाय, आर्थिक वर्ष 2022 ते 2024 दरम्यान कंपनीच्या ऑपरेशन्समधील उत्पन्न वाढीच्या बाबतीतही वार्षिक सरासरी वाढदर 34.83% आहे, जी उद्योगातील सरासरी 13.61% आणि समकक्ष कंपन्यांची 12.04% पेक्षा लक्षणीय जास्त आहे. (स्रोत: CRISIL अहवाल)

आनंद राठी ॲडव्हायजर्स लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड आणि वनव्ह्यू कॉर्पोरेट ॲडव्हायजर्स लिमिटेड या कंपनींची इश्यूच्या बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments