Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'खजिन्याची शोधयात्रा'चे शुक्रवारी प्रकाशन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘खजिन्याची शोधयात्रा’चे शुक्रवारी प्रकाशन

पुणे : प्रतिनिधी

भारतीय ज्ञानाचा खजिना, ते पंधरा दिवस, विनाशपर्व यासारख्या गाजलेल्या पुस्तकांचे सुप्रसिद्ध लेखक प्रशांत पोळ यांनी ‘खजिन्याची शोधयात्रा’ हे नवीन पुस्तक लिहिले असून या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते, शुक्रवारी (दि. ३० मे) सायंकाळी ५ वाजता येथील बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे.

या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी मंदिरस्थापत्य व मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर असून, प्रमुख पाहुणे म्हणून ना. चंद्रकांतदादा पाटील, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, ना. मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री, सहकार आणि नागरी विमान वाहतूक, भारत सरकार आणि ना. राकेश सिंह, मंत्री, लोकनिर्माण, मध्यप्रदेश हे उपस्थित राहणार आहेत.

सुमारे ८०० – ९०० वर्षांपूर्वीपर्यंत भारत हा जगातला सर्वात संपन्न, समृध्द आणि ज्ञानवान देश होता. जगातील एक तृतीयांश पेक्षा जास्त जीडीपी भारताची होती. आपण अनेक नवनवीन शोध धावले, मानवी मनाला थक्क करणारी अनेक मंदिरे बांधली, कलात्मक वास्तू, न्याय पद्धती, खेळ आणि कलाक्षेत्राचा विकास केला. या सर्वांचा लेखाजोखा, ‘खजिन्याची शोधयात्रा’ या पुस्तकात घेतलेला आहे.

या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘स्नेहल प्रकाशन’चे रवींद्र घाटपांडे यांनी केलेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments