मुंबई इंडियन्स (डब्ल्यूपीएल) संघाच्या माजी फलंदाजी प्रशिक्षक आणि केरळ महिला संघाच्या प्रशिक्षक म्हणून युवा खेळाडूंना घडवण्याचा समृद्ध अनुभव.
o स्मृती मंधानासोबत पुन्हा एकत्र येत खेळाडू मार्गदर्शन आणि संघातील एकसंधता अधिक बळकट होण्याची अपेक्षा
राष्ट्रीय २९ मे २०२५ – रत्नागिरी जेट्स या महाराष्ट्र प्रीमियर लीगचे (एमपीएल) विजेतेपद दोनदा मिळवणाऱ्या टीमला लीड परफॉर्मन्स कोच पदी देविका पळशीकर यांची नियुक्ती जाहीर करताना आनंद होत आहे. बहुप्रतीक्षीत सीझन ३ च्या पार्श्वभूमीवर पुरुष तसेच स्त्रियांच्या टीमसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. रणजीत पांडे दोन्ही टीम्सच्या प्रमुख कोचपदी कायम राहातील.
महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या सीझन ३ ची सुरुवात ४ जून २०२५ रोजी सुरू होणार असून पुरुषांची टीम ईगल नाशिक टायटन्सविरोधात टायटल डिफेन्सने सुरूवात करेल. वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूएमपीएल) शुभारंभाच्या आवृत्तीची सुरुवात ५ ते १४ जूनदरम्यान होणार असून रत्नागिरी जेट्स रायगड रॉयल्सविरोधात सुरुवात करतील.
माजी इंडिया इंटरनॅशनल देविका पळशीकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि ज्ञानाचा फ्रँचाईझीला लाभ होणार आहे. त्यांनी आपल्या कोचिंग करियरमध्ये आतापर्यंत वुमन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्ससाठी बॅटिंग कोच म्हणून काम केले आहे. केरला सीनियर वुमन्स टीमसाठी प्रमुख कोच पदावर असताना त्यांनी भारताच्या उदयोन्मुख स्त्री क्रिकेटर्सचा विकास करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
नव्या भूमिकेत देविका प्रमुख कोच रणजीत पांडे यांच्यासह डावपेचांचे नियोजन, कामगिरीचा विकास आणि सामन्याच्या तयारीसाठी काम करतील. एमपीएल आणि डब्ल्यूएमपीएलसाठीच्या त्यांच्या दुहेरी जबाबदारीतून कोचिंग तत्वांचे सहज एकत्रीकरण आणि फ्रँचाईझीमध्ये एकंदर गुणवत्ता आणण्याचे ध्येय आहे. विशेष म्हणजे, स्मृती मंधाना यांच्यासह असलेल्या त्यांच्या सहकार्यामुळे खेळाडू- मार्गदर्शक नाते आणखी मबजूत होण्यासाठी व टीममध्ये अनुरूपता वाढण्यासाठी मदत होईल.
आपल्या नव्या भूमिकेविषयी देविका पळशीकर म्हणाल्या, ‘महाराष्ट्र क्रिकेटमध्ये उच्च मापदंड प्रस्थापित करणाऱ्या रत्नागिरी जेटसारख्या फ्रँचाईझीमध्ये रूजू होताना मला आनंद होत आहे. खेळाडू व कोचिंग स्टाफसह काम करण्यासाठी मी उत्सुक असून आम्ही एकत्रितपणे गुणवत्ता, शिस्त व सातत्यपूर्ण सुधारणेची संस्कृती उभारण्याचे ध्येय ठेवले आहे. ध्येय डोळ्यापुढे ठेवून खेळणाऱ्या धाडसी, आत्मविश्वासपूर्ण व अनुरूप टीमची उभारणी करण्याचे माझे उद्दिष्ट आहे. नेतृत्व पदावर असलेली स्मृती आणि पॅशनेट सपोर्ट टीमच्या रूपाने प्रेरणादायी आणि खऱ्या अर्थाने काहीतरी खास साध्य करण्यासाठी लागणारा पाया आमच्याकडे तयार आहे. पुरुष तसेच स्त्रिया अशा दोन्ही टीम्सची दुहेरी जबाबदारी आकर्षक आव्हान असून मी ते पूर्णतः स्वीकारत आहे. आम्ही एकत्रितपणे भारतीय क्रिकेटच्या भावी विजेत्यांचे भविष्य घडवण्यासाठी उत्सुक आहोत.’
रत्नागिरी जेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रफुल चंदावरकर म्हणाले, ‘रत्नागिरी जेट टीमने कायमच विजेतेपदाच्या पलीकडे जात क्रिकेट क्षेत्रातील गुणवत्तेला समृद्ध होण्यासाठी पूरक, शाश्वत यंत्रणा उभारण्याचे ध्येय ठेवले आहे. देविका यांच्या नियुक्तीद्वारे जागतिक दर्जाचे कोचिंग देण्याची विशेषतः या सीझनमध्ये महिलांच्या टीमला आणखी सक्षम करण्याची आमची बांधिलकी दिसून येते. त्यांचे नेतृत्व, खेळाचे सखोल आकलन आणि खेळाडूंचा विकास करण्याची क्षमता दोन्ही टीम्सना क्रिकेटमध्ये गुणवत्तापूर्ण कामगिरी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.’
रत्नागिरी जेट्समागची ताकद असलेल्या जेटसिंथेसिसने ‘जेट्स क्लब’ या तळागाळातील उपक्रमाद्वारे पुरुष व महिलांच्या टीमला चालना दिली आहे. महाराष्ट्राच्या वंचित भागातील क्रिकेट क्षेत्रातील गुणवत्ता शोधून त्यांचा विकास करण्यासाठी बांधील असलेला हा उपक्रम फ्रँचाईझीची क्रिकेटच्या विकासाप्रती असलेली दीर्घकालीन बांधिलकी दर्शवणारा आहे. देविका पळशीकर लीड परफॉर्मन्स कोच या नात्याने आघाडीवर असताना महिलांची टीम शुभारंभाच्या डब्ल्यूएमपीएल सीझनमध्ये ठसा उमटवण्यासाठी व या भागातील तरुण खेळाडूंसाठी प्रेरणास्थान बनण्यासाठी सज्ज आहे.


