*
पुणे दि. ८ : वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील वारजे वाहतूक विभागांतर्गत नो पार्किंग व्यवस्थेत बदल करण्याचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची रमा पुरुषोत्तम शाळेच्या आऊट गेट-लक्ष्मी माता मंदिर ते भाजी मंडई (पंढरी निवास इमारत/श्री क्लिनिक समोर) मावळे आळी कडून कमिन्स चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूस ७५ मीटर भागात सर्व प्रकारच्या वाहनांना नो-पार्किंग करण्यात येत आहे.
वाहतूक बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात २१ फेब्रुवारीपर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उपआयुक्त शशिकांत बोराटे यांनी कळविले आहे.
0000


