Monday, October 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्त्रीचा सन्मान करणारा समाज जगावर राज्य करतो साहित्यिक मातृशक्ती सन्मानाने महिला साहित्यिकांचा...

स्त्रीचा सन्मान करणारा समाज जगावर राज्य करतो साहित्यिक मातृशक्ती सन्मानाने महिला साहित्यिकांचा गौरव नवा विष्णू चौक नवरात्र उत्सव मित्र मंडळाच्या वतीने आयोजन

पुणे : मृत्यूसाठी अनेक गोष्टी असल्या, तरी जन्म देण्याची शक्ती एकाच ठिकाणी आहे, ती म्हणजे आई. तिच्या माध्यमातून समाजाची उभारणी होते. समाजाच्या जडणघडणीत स्त्रीचे योगदान महत्त्वाचे आहे. ज्या समाजात स्त्रीचा सन्मान केला जातो, तो समाज जगावर राज्य करतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह सुनेत्रा मंकणी यांनी केले.

 

स्व. द. मा. मिरासदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नवा विष्णू चौक नवरात्र उत्सव मित्र मंडळाच्या वतीने साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘साहित्यिक मातृशक्ती सन्मान २०२६’ या पुरस्काराने महिला साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. यावेळी मंकणी बोलत होत्या. प्रा. संगीता हेमंतराजे मावळे यांची विशेष उपस्थिती होती. त्यासोबतच मंडळाचे कार्याध्यक्ष कुमार रेणुसे, चारुलता मानापुरे,पल्लवी सोनगुल , वैशाली सुरगुडे, पूनम गांधी उपस्थित होते.

 

प्रा. संगीता मावळे म्हणाल्या, स्त्री ही बीजापासून ब्रह्मांडापर्यंतचा प्रवास घडवते. स्त्रीने स्वतःला कमी समजू नये. आपल्या सभोवतालचे जग प्रकाशित करण्यासाठी प्रत्येक स्त्री प्रयत्नशील असते.

 

या वेळी डॉ. अंजली जोशी, प्रिया जोग, विनिता देशपांडे, डॉ. मृणालिनी जमदग्नी, स्वाती वैद्य, सुषमा हिरेकुरुर, माधुरी जोशी, रुपाली भुसारी आणि डॉ. नयना कासखेडीकर या महिला साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला. माधुरी जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. मृणालिनी दुसाने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी आभार

मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments