पुणे,5 जून 2025 : शाश्वततेच्या क्षेत्रात काम करणारी पुण्यातील स्टार्टअप कंपनी असलेल्या एक्सप्लोरइट तर्फे नुकतेच एमसीसीआयए ट्रेड टॉवर येथे पुणे अर्बन समिट ही परिषद आयोजित करण्यात आली होती.यामध्ये शाश्वतता तज्ञ,उद्योगातील नेतृत्व व या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा समावेश होता. डॉ.गुरूदास नूलकर व डॉ.एराक बरूचा यांनी बीजभाषण करत आपले शहर अधिक शाश्वत व पर्यावरणपूरक कसे करता येईल यावर मार्गदर्शन केले. एक्सप्लोरइटचे संस्थापक शिवम सिंग यांनी शाश्वत शहरी विकासात कॉर्पोरेट क्षेत्राचा सहभाग यावर आपले विचार मांडले.


