Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वृक्षारोपण सप्ताहाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद... जागतिक पर्यावरण दिनानिमित्त...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वृक्षारोपण सप्ताहाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद… जागतिक पर्यावरण दिनानिमित्त १८९९ रोपट्यांचे आज वृक्षारोपण

पिंपरी, दि. ५ जून २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५’ नुसार वृक्षसंवर्धनाच्या उपाययोजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गत शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाच्या वतीने “वृक्षारोपण सप्ताह २०२५” आयोजित करण्यात आला आहे.

या सप्ताहाची सुरुवात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिनांक ०५ जून २०२५ रोजी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान येथे करण्यात आली. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता ३२ वृक्षांचे रोपण करून अभियानाची औपचारिक सुरुवात झाली.

या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उपायुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, कार्यकारी अभियंता हरविंदसिंग बन्सल, उद्यान अधिक्षक राजेश वसावे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, शैलेश मोरे, सुनिल कदम, विजय घोडके, श्रीकृष्ण काशीद, महाराष्ट्र राज्य मर्दानी खेळ असोसिएशनचे संजय बनसोडे, श्रेयस चव्हाण, शिवदत्त सिंघ, शिवम बाबर, पिंपरी संभाजीनगर रोटरी क्लबचे संतोष गिरांजे, सेवा सारथी फाऊंडेशन संभाजीनगरचे ओंकार मांडगे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट – वृक्षारोपण सप्ताहाच्या निमित्ताने महानगरपालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत विविध ठिकाणी १८९९ वृक्षारोपण करण्यात आले, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे:

अ क्षेत्रीय कार्यालय – दुर्गादेवी टेकडी, विविध पालिका उद्याने आणि रस्त्यांवर २१० वृक्षांचे रोपण

ब क्षेत्रीय कार्यालय – रावेत जॉगर्स पार्क, जिजाऊ पर्यटन केंद्र, विद्युत वाहिनी स्मशानभूमी रस्ता येथे २४५ वृक्षांचे रोपण

क क्षेत्रीय कार्यालय – गुरु गणेश उद्यान, इंद्रायणीनगर डीसी सर्कल, टेल्को गेट येथे २३० वृक्षांचे रोपण

ड क्षेत्रीय कार्यालय – लिनीअर गार्डन, ऑक्सिजन पार्क, ज्ञानज्योती उद्यान, औंध मिलिटरी कॅम्प येथे ९२५ वृक्षांचे रोपण

ई क्षेत्रीय कार्यालय – कुदळे उद्यान येथे ४५ वृक्षांचे रोपण

फ क्षेत्रीय कार्यालय – अहिल्याबाई होळकर उद्यान, बायो डायव्हर्सिटी पार्क, अटल बिहारी वाजपेयी उद्यान आणि विविध रस्त्यांवर १७९ वृक्षांचे रोपण

ग क्षेत्रीय कार्यालय – पिंपरी जलतरण तलाव परिसरात १० वृक्षांचे रोपण

ह क्षेत्रीय कार्यालय – अब्दुल कलाम उद्यान, किल्लेदार उद्यान, कासारवाडी एस.टी.पी रोड येथे ५५ वृक्षांचे रोपण

यावेळी विविध क्षेत्रांमधील मान्यवर तसेच पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. या उपक्रमामुळे पिंपरी चिंचवड शहरात पर्यावरण संवर्धनासाठी नागरिक, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक बळकट झाला आहे. पुढील काळातही महानगरपालिका अशाच उपक्रमांद्वारे ‘हरित पिंपरी चिंचवड’ घडवण्याचा संकल्प दृढपणे पुढे नेणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments