नवी दिल्ली/मुंबई, 4 जून 2025 — ज्युनिपर ग्रीन एनर्जीने चपळगाव, महाराष्ट्र येथील 145.99 MWp / 100 MW क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या वेळेपूर्वी यशस्वी कार्यान्वयनाची घोषणा केली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) ला वीजपुरवठा करणार आहे. प्रकल्पाची कार्यान्वयन तारीख 22 मे 2025 असून, ही निर्धारित व्यवसायिक कार्यान्वयन तारखेच्या 19 महिन्यांपूर्वी आणि विद्युत खरेदी करार (PPA) 7 मार्च 2025 रोजी साइन झाल्यानंतर केवळ 2.5 महिन्यांतच पूर्ण करण्यात आला आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यापासून 145.99 MWp या पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील.
हा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे, ज्युनिपर ग्रीन एनर्जीचा अक्षय ऊर्जा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने कार्यान्वित करण्याची क्षमता याचे उत्तम उदाहरण आहे. वेळेत प्रकल्प विकसित करण्याची आमची रणनीती आम्हाला निर्धारित वेळेपेक्षा आधी प्रकल्प पूर्ण करून स्वच्छ ऊर्जा ग्रीडमध्ये जोडण्यास सक्षम करते. वेळीच जमीन संपादन आणि साइट डेव्हलपमेंट, तांत्रिक व पर्यावरणीय तपासणी, ग्रीड कनेक्शनसाठी आवश्यक परवाने, ट्रान्समिशन लाइनची तयारी, तसेच पायाभूत सुविधांची उपलब्धता, यामुळे संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडते आणि आमच्या यशामध्ये मोलाची भर घालते,” असे ज्युनिपर ग्रीन एनर्जीचे CEO अंकुश मलिक यांनी सांगितले.
ज्युनिपर ग्रीन एनर्जीच्या पुढाकार घेणाऱ्या दृष्टिकोनामुळे ते निर्धारित वेळेआधी उच्च दर्जाचे प्रकल्प पूर्ण करण्यात यशस्वी ठरतात, ज्यामुळे भारताच्या ग्रीड विश्वसनीयतेला आणि अक्षय ऊर्जा लक्ष्यांना पाठबळ मिळते.


