Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट नोएडाने तिसऱ्या स्‍टार्टअप समिटसह भारताच्‍या तंत्रज्ञान भविष्‍याला चालना दिली

सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट नोएडाने तिसऱ्या स्‍टार्टअप समिटसह भारताच्‍या तंत्रज्ञान भविष्‍याला चालना दिली

गुरूग्राम, भारत, जून ४, २०२५: सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट, नोएडा (एसआरआय-नोएडा)ने आपल्‍या तिसऱ्या स्‍टार्टअप समिटचे यशस्‍वीरित्‍या आयोजन केले. वैविध्‍यपूर्ण तंत्रज्ञान दाखवण्‍यासाठी, अर्थपूर्ण सहयोगांना चालना देण्‍यासाठी आणि नाविन्‍यतेच्‍या भविष्‍याबाबत चर्चा सुरू करण्‍यासाठी हा इव्‍हेण्‍ट राबवण्‍यात आला.

नवीन एडिशनमध्‍ये एआय-फर्स्‍ट स्‍टार्टअप्‍स आणि जागतिक तंत्रज्ञान प्रमुख एकत्र आले, जेथे आरोग्‍यसेवा, लँग्‍वेज मॉडेल्‍स, ऑडिओ डीपफेक डिटेक्‍शन आणि एक्‍स्‍टेण्‍डेड रिअॅलिटी (एक्‍सआर) यामधील अत्‍याधुनिक सुधारणांवर लक्ष केंद्रित करण्‍यात आले.

या समिटमधून क्रॉस-फंक्‍शनल सहयोगाच्‍या माध्‍यमातून नैतिक एआय, डिजिटल विश्‍वास आणि नेक्‍स्‍ट-जनरेशन इनोव्‍हेशनसाठी महत्त्वपूर्ण गरज निदर्शनास आली. तसेच, या इव्‍हेण्‍टमधून प्रबळ तंत्रज्ञान सहयोग, क्रॉस-इंडस्‍ट्री सहयोग आणि सर्वोत्तम टॅलेंटचा फायदा घेत भारतातील नाविन्‍यता इकोसिस्‍टम मजबूत करण्‍याप्रती सॅमसंगची अविरत कटिबद्धता दिसून आली.

या वर्षीच्‍या इव्‍हेण्‍टमध्‍ये एआय, सर्वोत्तम तंत्रज्ञान, आरोग्‍यसेवा आणि नॅच्‍युरल लँग्‍वेज प्रोसेसिंगमध्‍ये काम करणारे सर्वम एआय, जीवी एआय, हेल्‍थीफायमी, व्‍हॅलिडसॉफ्ट, कोगो एआय, निओडॉक्‍स, एनेबलएक्‍स आणि मॅग्‍नीमस या आठ अग्रगण्‍य स्‍टार्टअप्‍सचा समावेश होता. या स्‍टार्टअप्‍सनी त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय उत्‍पादनांना दाखवले आणि सॅमसंगची आरअँडडी केंद्रे, व्‍यवसाय युनिट्स व सॅमसंग व्‍हेंचर्समधील टीम्‍ससोबतच्‍या संभाव्‍य पायलट सहयोगांचा शोध घेतला. या सहभागीना स्‍टार्टअप्‍सना त्‍यांची नाविन्‍यता क्षमता, सॅमसंगच्‍या दृष्टिकोनासोबत धोरणात्‍मक संलग्‍नता आणि जागतिक स्‍तरावर प्रगती करण्‍याची क्षमता या आधारावर काळजीपूर्वक निवडण्‍यात आले.

‘एसआरआय-नोएडा संशोधन व नाविन्‍यता अजेंडाला चालना देत असताना तिसऱ्या स्टार्टअप समिटच्‍या यशामधून अर्थपूर्ण अपस्किलिंग, शाश्वत सहयोग आणि सखोल इकोसिस्‍टम सहभागाच्‍या माध्‍यमातून भावी तंत्रज्ञान प्रमुखांना सक्षम करण्‍याप्रती आमचे मिशन दिसून येते. यंदाचे एडिशन अधिक मोठे, अधिक आकर्षक आणि अधिक प्रभावी होते, जेथे समकालीन आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासोबत उद्योजकांना सोल्‍यूशन्‍स निर्माण करण्‍यास सक्षम करण्‍यात आले, जे जागतिक स्‍तरावर स्‍पर्धात्‍मक व स्‍थानिक पातळीवर संबंधित आहेत,” असे एसआरआय-नोएडाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक क्‍यूनग्‍यून रू म्‍हणाले.

सहभागी स्‍टार्टअप्‍सची यादी पुढीलप्रमाणे:

· सर्वम एआय: बहुभाषिक सिंगल मॉडेल ऑडिओ एलएलएम प्‍लॅटफॉर्म.

· जीवी एआय: मोठे-लँग्‍वेज-मॉडेल-आधारित आरोग्‍यसेवा प्‍लॅटफॉर्म, जो एआय डॉक्‍टर व विश्‍लेषक देतो.

· हेल्‍थीफायमी: वैयक्तिकृत आहारसंबंधित शिफारशींसाठी एआय-संचालित न्‍यूट्रिशन इंटेलिजन्‍स इंजिन.

· व्‍हॅलिडसॉफ्ट: डीपफेक कॉल जोखीमांचे निराकरण करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेली अत्‍याधुनिक ऑडिओ लिव्‍हनेस डिटेक्‍शन सिस्‍टम.

· कोगो एआय: वॉईस-संचालित उपयोजन देणारे लार्ज अॅक्‍शन मॉडेल (एलएएम).

· निओडॉक्‍स: रिअल-टाइम, पॉइण्‍ट-ऑफ-केअर आरोग्‍य मूल्‍यांकनांसाठी मोबाइल-आधारित डायग्‍नोस्टिक्‍स.

· एनेबलएक्स: सुधारित युजर परस्‍परसंवादासाठी रिअल-टाइम फेशियल एक्‍स्‍प्रेशन आणि फिचर-डिटेक्‍शन क्षमता.

· मॅग्‍नीमस: सहभाग व स्‍वास्‍थ्‍याला चालना देणारे गेमिफाईड एक्‍सआर-आधारित फिटनेस अनुभव.

या इव्‍हेण्‍टचे खास आकर्षण डायनॅमिक पॅनेल चर्चासत्र ठरले, ज्‍यामध्‍ये स्‍टार्टअपचे संस्‍थापक आणि एसआरआय-नोएडा लीडरशीपचा समावेश होता. या चर्चासत्रामध्‍ये एआय एजंट्सचा उदय, डिजिटल हेल्‍थ प्‍लॅटफॉर्म्‍समध्‍ये वैयक्तिकृत सहभागाची गरज आणि पारदर्शक डेटा प्रशासनाची आवश्‍यकता यावर चर्चा करण्‍यात आली. पॅनेलिस्‍ट्सनी एआयचे नैतिक अवलंबन आणि युजर अवलंबनाला आकार देण्‍यामध्‍ये विश्‍वासाची महत्त्वपूर्ण भूमिका यावर देखील भर दिला.

वर्तन बदलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आरोग्य परिणाम सुधारण्यासाठी वापरकर्त्यांचे अनुभव आणि वैयक्तिकृत अभिप्राय यांचे वाढते महत्त्व या चर्चेमधून निदर्शनास आले. समिटच्‍या सर्वोत्तम फॉरमॅटने भारतातील सॅमसंगच्या इनोव्हेशन नेटवर्कची सर्वांगीण माहिती दिली, क्रॉस-फंक्शनल सहयोगांना चालना दिली, नवीन सहयोग अनलॉक केले आणि स्‍टार्टअप्‍सना जागतिक तंत्रज्ञान ट्रेण्‍ड्सची ओळख करून दिली. सॅमसंग तज्ञांसोबत सहजपणे संवाद साधता येण्‍यासाठी आणि उत्पादन विकास व बाजारपेठेतील तयारीला गती देण्यासाठी सहभागींनी प्‍लॅटफॉर्मचे कौतुक केले.

आरोग्‍यसेवा एआय, लँग्‍वेज प्रोसेसिंग, डीपफेक डिटेक्‍शन, व्हिज्‍युअल एआय आणि एक्‍सआरमधील उदयोन्‍मुख तंत्रज्ञानांवर प्रकाश टाकत स्‍टार्टअप समिटने परिवर्तनात्‍मक नाविन्‍यतेला गती देण्‍यामध्‍ये एसआरआय-नोएडाच्‍या महत्त्वपूर्ण भूमिकेची पुष्‍टी दिली. या इव्‍हेण्‍टने सॅमसंगच्‍या मोठ्या दृष्टिकोनाला गती दिली, ते म्‍हणजे सहयोगाने भविष्‍यासाठी सुसज्‍ज स्‍टार्टअप इकोसिस्‍टम घडवणे, जी मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण, मानव-केंद्रित प्रभाव निर्माण करेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments