Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedशहर स्वच्छ ठेवणारे सफाई कर्मचारी समाजातील खरे हिरो - आमदार हेमंत रासने...

शहर स्वच्छ ठेवणारे सफाई कर्मचारी समाजातील खरे हिरो – आमदार हेमंत रासने आमदारांचा आरोग्य कोटीना भेट देत सफाई कर्मचाऱ्यांची संवाद, जाणून घेतल्या अडचणी

पुणे (दि. ७ जून) : आपले शहर स्वच्छ ठेवण्यात महापालिकेतील सफाई कर्मचारी अत्यंत मोलाचे योगदान देतात. दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत परिसराच्या स्वच्छतेसाठी ते मेहनत घेतात. मात्र, या सेवेत असताना त्यांना अनेक अडचणींनाही समोर जावं लागतं. ही परिस्थिती लक्षात घेत कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व आरोग्य कोटींना भेट देत संवाद साधला.

आमदार हेमंत रासने यांच्या नेतृत्वाखाली ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा’ हे अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत कचऱ्याचे क्रॉनिक स्पॉट्स हटवून त्या ठिकाणी सुशोभीकरण, तीन शिफ्टमध्ये कचरा संकलनासाठी वाहनांची व मनुष्यबळाची वाढ, रस्त्यावरील बेवारस वाहने हटवणे, जनजागृती मोहीम आणि गरजेनुसार दंडात्मक कारवाई अशा उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. या सर्व कामांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे रासने यांनी यावेळी स्पष्ट केले.

“स्वच्छता राखण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या पाठिशी उभं राहणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. साधनांची कमतरता, अपुरं मनुष्यबळ आणि आरोग्यविषयक समस्या यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना केली जात आहे. नागरिकांचा देखील या अभियानात अधिकाधिक सहभाग वाढवण्यावर भर देण्यात येत असल्याचं रासने यावेळी म्हणाले.

या भेटीवेळी मंडल अध्यक्ष अमित कंक, प्रशांत सुर्वे, माजी नगरसेवक राजेश येनपुरे, गायत्री खडके, मनिषा घाटे, धनंजय जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments