Sunday, November 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedलक्ष्मीपूजनाला श्री महालक्ष्मी देवीला सुवर्णसाडी व मुकुट परिधान*  ...

लक्ष्मीपूजनाला श्री महालक्ष्मी देवीला सुवर्णसाडी व मुकुट परिधान*  *श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग ; वर्षातून दोन वेळा योग*

 

 

पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग च्या वतीने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री महालक्ष्मी देवीला १६ किलो सोन्याची साडी आणि सुमारे २ किलो सोन्यापासून तयार करण्यात आलेला रत्नजडित मुकुट परिधान करण्यात आला. वर्षातून दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजन या दिवशी देवीला ही साडी परिधान करण्यात येते. त्यामुळे सुवर्णवस्त्रांनी सजलेले हे महालक्ष्मी देवीचे रूप पाहण्यासोबतच दर्शनाकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली.

 

दिवाळीच्यानिमित्ताने मंदिराचे प्रवेशद्वार आणि सभामंडपासह संपूर्ण मंदिर परिसरात विविध प्रकारची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त ॲड. प्रताप परदेशी, विश्वस्त व उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, राजेश सांकला, रमेश पटोदिया, राजकुमार चमडीया, निलेश लद्दड यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी याचे आयोजन केले आहे.

 

प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, हैद्राबाद मध्ये साडीची कलाकुसर साकारण्यात आली असून सुमारे ६ महिने काम सुरु होते. आकर्षक नक्षीकाम करून ही साडी देवीसाठी साकारण्यात आली आहे. तसेच सुमारे २ किलो सोन्याच्या मुकुटावर करण्यात आलेले अतिशय सुबक आणि नाजूक नक्षीकाम हे विशेष लक्षवेधी आहे. पारंपरिक धार्मिक संकल्पना, उत्कृष्ट सुवर्णकारिता आणि कलात्मक सौंदर्य यांचा सुंदर संगम या मुकुटामध्ये पाहायला मिळतो. दसऱ्याच्या निमित्ताने भाविकांसाठी हा सुवर्ण मुकुट विशेष आकर्षण ठरत असून, श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला आणखी एक दिव्य आणि वैभवशाली स्वरूप प्राप्त झाले आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments