पुणे,10 जून 2025 : एअर कंडिशनिंग सोल्युशन्समध्ये आघाडीची कंपनी असलेल्या जॉन्सन कंट्रोल्स – हिताची एअर कंडिशनिंग इंडिया लि.ने पुण्यात नुकत्याच संपन्न झालेल्या व्हीआरएफ टेक्नो मीट 2025 मध्ये आपल्या अद्ययावत व्हेरिएबल रेफ्रिजरंट फ्लो (व्हीआरएफ) सिस्टिम्स प्रदर्शित केल्या.पुण्यात झालेल्या कार्यक्रमाची कंपनी मुख्य प्रायोजक होती. हे नाविन्यपूर्ण सोल्युशन विशेष करून उंच इमारतींसाठी डिझाईन केले गेले आहे. चार तासाच्या या कार्यक्रमात जॉन्सन कंट्रोल्स – हिताची एअर कंडिशनिंग इंडिया लि.चे व्यवसाय नियोजन सरव्यवस्थापक कृतंजय त्यागी यांच्या अभ्यासपूर्ण सादरीकरणाचा समावेश होता.याशिवाय मालपाणी ग्रुपचे संचालक आशिष मालपाणी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करताना रिअल इस्टेट व बांधकाम क्षेत्रातील उदयोन्मुख ट्रेंडसवर मौल्यवान अंर्तदृष्टी प्रदान केली.
उर्जा कार्यक्षम हीटींग,व्हेंटिलेशन आणि एअरकंडिशनिंग (एचव्हीएसी) सोल्युशन्सची वाढती गरज तसेच हवामान नियंत्रणाची गरज यामुळे भारतात व्हेरिएबल रेफ्रिजरंट फ्लो (व्हीआरएफ) तंत्रज्ञानाची मोठी मागणी आहे.बोनाफाईड रिसर्चनुसार,2024 ते 2029 पर्यंत भारताच्या व्हीआरएफ बाजारपेठ 17 टक्के पेक्षा जास्त वार्षिक चक्रवाढ दराने वाढण्याचा अंदाज आहे. इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफिजरेटिंग ॲन्ड एअरकंडिशनिंग इंजिनिअर्स (इशरे) तर्फे आयोजित व्हीआरएफ टेक्नो मीट 2025 हे उद्योगातील नेतृत्वाच्या एकत्रीकरणासाठी आणि एचव्हीएसी आणि बिल्डिंग तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल ज्ञान आदान-प्रदान करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले.
हिंजवडी,मगरपट्टा आणि ईऑन आयटी पार्क सारख्या प्रमुख टेक पार्क सह पुण्याचे आयटी हब म्हणून स्थान दृढ होत असून कार्यक्षम कुलिंग सोल्युशन्सची मागणी वाढत आहे. झपाट्याने झालेले शहरीकरण,विकासामध्ये मिश्र वापर आणि प्रिमियम गृहनिर्माण प्रकल्पांमुळे प्रगत एचव्हीएसी प्रणालींची गरज आणखी वाढत आहे आणि विविध व्यवसाय हे शाश्वततेसाठी उर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाला प्राधान्य देत आहे.
जॉन्सन कंट्रोल्स – हिताची एअर कंडिशनिंग इंडिया लि.चे व्यवसाय नियोजन सरव्यवस्थापक कृतंजय त्यागी म्हणाले की, जॉन्सन कंट्रोल्स – हिताची एअर कंडिशनिंग इंडिया लि.मध्ये आम्ही सक्रीयपणे अभिनवतेला प्राधान्य देतो आणि हवामान नियंत्रण तंत्रज्ञानात सर्व परिसीमा ओलांडून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान प्रदान करण्याचा प्रयत्न करतो.आमचे व्हेरिएबल रेफ्रिजरंट फ्लो (व्हीआरएफ) सोल्युशन्स हे उंच इमारतींच्या राहणीमानाच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यात एक उल्लेखनीय प्रगती आहे.या तंत्रज्ञानामुळे उर्जा कार्यक्षमता वाढून प्रत्येक रहिवाशाला आरामदायी अनुभव मिळतो.आमची व्हीआरएफ प्रणाली केवळ आधुनिक इमारतींच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी नव्हे तर त्याचे रूपांतर शाश्वतता आणि उच्च कार्यक्षमतेवर भर देणारे सानुकूलित उपायांसाठी देखील आहे. एचव्हीएसी आणि बिल्डिंग तंत्रज्ञानाच्या परिवर्तनीय प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी आणि एअर कंडिशनिंगच्या भविष्याबद्दल चर्चा करण्यासाठी व्हीआरएफ टेक्नो मीट 2025 हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे.
व्हीआरएफ सिस्टिम्सच्या नाविन्यपूर्ण वैशिष्टयांमध्ये उर्जा कार्यक्षमता,अचूक तापमान नियंत्रण,स्मार्ट ऑटोमेशन,फ्लेक्सीबल इंस्टॉलेशन ,आवाजाविना कार्यान्वयन,सीमलेस इंटीग्रेशन तसेच कॉम्पॅक्ट व स्केलेबल डिझाईनचा समावेश आहे.या व्हीआरएफ सिस्टिम्सची रचना उच्चतम कामगिरी प्रदान करताना कमीत कमी उर्जेचा वापर करण्यासाठी केली गेली आहे,ज्यामुळे हे आधुनिक इमारतींसाठी एक शाश्वत पर्याय बनतात. कस्टमाईज्ड क्लायमेट फीचरमुळे खोल्यांना प्राधान्याप्रमाणे गरम किंवा थंड होण्यास मदत होते.व्यावसायिक इमारती,कार्यालये,लक्झरी निवासस्थाने आणि डाटा सेंटर्ससारखी हिताची व्हीआरएफ सिस्टिम्स हे आदर्श उपाय आहेत,जिथे कस्टमाईज्ड क्लायमेट कंट्रोल आवश्यक आहे.क्लाऊड आधारित सेंट्रलाईज्ड कंट्रोलर असलेल्या आयक्लाऊड प्रो सह कुणीही दुरस्तपणे वातावरणाचे नियंत्रण करू शकते.


