पुणे,9 फेब्रुवारी 2024 : कमिन्स इंडिया लि.च्या संचालक मंडळाने नुकत्याच झालेल्या बैठकीत 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत अलेखापरिक्षित वित्तीय निकालांना मान्यता दिली. 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत एकूण विक्री गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत 17 टक्क्यांनी वाढून 2502 कोटी रूपयांपर्यंत पोहचली आहे. देशांतर्गत विक्री गेल्या वर्षीच्या या तिमाहीच्या तुलनेत 36 टक्क्यांनी वाढून 2177 कोटी रूपयांपर्यंत तर निर्यात विक्री गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 40 टक्क्यांनी कमी होऊन 325 कोटी रूपयांवर पोहचली आहे. करपश्चात नफा गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 26 टक्क्यांनी वाढून 455 कोटी रूपयांपर्यंत पोहचला आहे.
कमिन्स इंडिया लि.चे तिसर्या तिमाहीचे निकाल
RELATED ARTICLES


